कोल्हापूर: खास. मंडलिक- महाडीक गट एकत्र


कोल्हापूर: कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक(MP) हे शिंदे गटात सामील झाले आहेत. यामुळे सहकार क्षेत्रासह विविध ठिकाणी नक्कीच आम्ही एकत्र राहून आघाडी करू असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

खासदार धनंजय महाडिक(MP) यांनी शनिवारी कोल्हापुरात माध्यम प्रतिनिधीशी बोलताना म्हटले की, माजी मंत्री सतेज पाटील यांनी काही दिवसांपूर्वी एक विधान केले होते की आम्ही रणांगणात उत्तर देऊ त्यालाच उत्तर देताना महाडिक म्हणाले, त्यांना आम्ही अनेक निवडणुकांमध्ये पराभव झाल्याने आम्ही रणांगणातून बाहेर गेलो आहोत असा समज होता. मात्र, आता आम्ही रणांगणातच आहोत. येणाऱ्या निवडणुकांमध्ये ताकदीने उतरणार असेही महाडीकांनी स्पष्ट केले. शिवाय येणाऱ्या काळात अनेक प्रलंबित प्रश्न आपण सोडवणार असल्याचे प्रतिउत्तर दिले. खास. संजय मंडलिक आता 5 शिंदे गटात आले आहेत. त्यामुळे आगामी काळात कोल्हापुरात सहकारसह अनेक ठिकाणी आघाडी होऊ शकेल. शिवाय तशी चर्चा झाली तर निश्चितच आम्ही त्यामध्ये इच्छुक आहोत असे वक्तव्य खासदार धनंजय महाडिक(MP) यांनी केले. ते कोल्हापुरात माध्यमांसोबत बोलत होते. शिवाय मंडलिक यांनी शिंदे गटात येण्यापूर्वी माझ्याशी सुद्धा चर्चा केली होती. मात्र त्यांनी काय चर्चा केली हे मात्र आपण सांगणार नसल्याचे महाडिक यांनी म्हटले. त्यांच्या या विधानानंतर कोल्हापुरातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे..

Join our WhatsApp group