ईडीने जप्त केलेले पैसे आणि दागिने नेमके कुठे जातात? घ्या जाणून

ताजी बातमी ऑनलाईन टीम

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पश्‍चिम बंगालमधील हायप्रोफाईल शिक्षक भरती घोटाळ्यात छापेमारी केली. यावेळी पार्थ चॅटर्जीची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी हिच्या घरातून 50 कोटींहून अधिक रोख आणि सोने जप्त केले. अर्पिताच्या घरावर छाप्यात सापडलेल्या पैशांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेकांच्या मनात प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात सापडलेल्या पैशांचे काय होते? आज याच प्रश्नाची उत्तर आपण जाणून घेणार आहोत.पंचनाम्यावर घेतात सही
ईडीने गेल्या 4 वर्षांत 67000 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडी जेव्हा जेव्हा छापे टाकते तेव्हा बहुतेक ठिकाणी त्यांना यश मिळते, कोट्यवधी रुपये रोख आणि इतर मालमत्ता मिळतात. सरकारी एजन्सी छापे टाकते तेव्हा तिला कागदी कागदपत्रे, रोख रक्कम, सोने, चांदी आणि इतर गोष्टी सापडतात. छाप्यात जप्त केलेल्या मालाचा अधिकारी पंचनामा करतात. ज्यांचा माल जप्त करण्यात येत आहे, त्यांची सही देखील पंचनाम्यात असते. त्यानंतर जी मालमत्ता जप्त केली जाते त्याला केस प्रॉपर्टी म्हणतात.

Join our WhatsApp group