Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनप्रेग्नेंसीच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच आलिया भट्ट-कपूरच्या बेबी बंपचे फोटो Viral

प्रेग्नेंसीच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच आलिया भट्ट-कपूरच्या बेबी बंपचे फोटो Viral

बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट-कपूर सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच तिन गुडन्यूज दिली आहे. आलियाने इन्स्टाग्रामवर सोनोग्राफीचा फोटो शेअर केले होते. आता आलियाचे बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

एक महिन्यापूर्वी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी त्यांच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. तेव्हापासून या दाम्प्त्यासह कपूर फॅमिली नव्या पाहुण्याच्या स्वागताच्या तयारीला लागले आहेत.

नुकताच आलिया भट्टला फिल्मसिटीमध्ये पापाराझींनी स्पॉट केलं. आता हेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
फोटोंमध्ये आलियाच्या चेहऱ्यावर गरोदरपणाची चमक स्पष्ट दिसत आहे.

प्रेग्नेंसीची घोषणा केल्यानंतर आलियाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.फोटोमध्ये आलियाने पीच रंगाचं फ्रॉक सूट घातला आहे. सोबतच आलियाने कोल्हापुरी चप्पल घातली आहे. एवढंच नाही तर, नो मेकअप लूकमध्ये आलिया प्रचंड सुंदर दिसत आहे.

आलियाचा लूक पाहून पुन्हा अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांनी जोर धरला आहे. सैल ड्रेसमध्ये आलिया पाहिल्यानंतर प्रत्येक जण अभिनेत्रीच्या बेबी बंपबद्दल चर्चा करत आहेत.सध्या कपूर आणि भट्ट कुटुंब नव्या पाहुण्याच्या प्रतीक्षेत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -