Thursday, April 18, 2024
Homeनोकरीपंजाब नॅशनल बॅंकेत बंपर पदभरती, ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीची संधी…!!

पंजाब नॅशनल बॅंकेत बंपर पदभरती, ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीची संधी…!!

बॅंकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. पंजाब नॅशनल बॅंकेत विविध पदांसाठी नोकर भरतीची प्रक्रिया सुरु आहे.. या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.. पात्र उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे..

पंजाब नॅशनल बॅंकेत (PNB Recruitment 2022) होत असलेल्या या भरतीबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

एकूण पदांची संख्या – 103

या पदांसाठी भरती

ऑफिसर (फायर सेफ्टी) – 23
मॅनेजर (सिक्युरिटी) – 80

शैक्षणिक पात्रता

ऑफिसर (फायर सेफ्टी) : नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूरमधून ‘बीई’ केलेलं असावं.. किंवा ‘फायर टेक्नॉलॉजी’ अथवा ‘सेफ्टी अँड फायर इंजिनिअरिंग’मध्ये बॅचलर्स डिग्री असावी. एक वर्षाचा अनुभव आवश्यक.

मॅनेजर (सिक्युरिटी) – मान्यताप्राप्त कॉलेजमधून कोणत्याही विषयातील डिग्री असावी. आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये 5 वर्षांचा अनुभव किंवा पोलिस खात्यात ‘ड्युप्टी सुप्रिटेंडंट’ अथवा ‘असिस्टंट कमाडंट’ म्हणून 5 वर्षांची सेवा असावी.

वयोमर्यादा – 21 ते 35 वर्षे

निवड – उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा व मुलाखतीद्वारे होईल..

अर्ज शुल्क

सर्वसाधारण गट – 1003 रुपये
राखीव प्रवर्ग – 59 रुपये

पगार

ऑफिसर (फायर सेफ्टी) : 36,000 ते 63,840 रुपये
मॅनेजर – 48,170 ते 69810 रुपये

अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख – 30 ऑगस्ट 2022

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://www.pnbindia.in/

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -