Thursday, March 28, 2024
HomeनोकरीBSF मध्ये भरती होण्याची सुवर्ण संधी, 323 रिक्त पदांवर भरती सुरू, असा...

BSF मध्ये भरती होण्याची सुवर्ण संधी, 323 रिक्त पदांवर भरती सुरू, असा करा अर्ज


सीमा सुरक्षा दलात (BSF) भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बीएसएफमध्ये हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल) आणि एएसआय (स्टेनोग्राफर) या पदांसाठी अर्ज (BSF Recruitment 2022) मागवण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 323 पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 सप्टेंबर 2022 आहे.

महत्वाच्या तारखा
ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झालेल्या तारीख: 08 ऑगस्ट 2022
ऑनलाइन नोंदणी करण्याची शेवटची तारीख : 06 सप्टेंबर 2022

रिक्त पदांची संख्या
एकूण रिक्त पदे – 323 पदे
हेड कांस्टेबल- 312 पदे
एएसआय- 11 पदे

अधिकृत वेबसाइटrectt.bsf.gov.in

वर जाऊन उमेदवार अर्ज करू शकतात.

आवश्यक पात्रता आणि वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 12वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षांदरम्यान असावे.

ऑनलाईन अर्ज कसा करावा?
इच्छुक उमेदवार 06 सप्टेंबर 2022 पर्यंत सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, कौशल्य (टायपिंग स्पीड/शॉर्टहँड स्पीड), वय, शारिरीक फिटनेस इत्यादींची आवश्यकता पूर्तता कारवी लागेल ही पात्रता पुर्ण करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ASI (स्टेनो) आणि HC (मिनिस्ट्रियल) या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क म्हणून 100 रुपये भरणे आवश्यक आहे.

किती पगार मिळेल?
हेड कॉन्स्टेबल पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 25,500 रुपये ते 81,100 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल. तर एसआय पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 29200 रुपये ते 92300 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल. या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक तपशील जाणून घेण्यासाठी उमेदवारांना बीएसएफच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अधिसूचना वाचण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -