लंडनच्या मार्केटमध्ये पती Nick Jonas सोबत शॉपिंग करताना दिसली Priyanka Chopra, फोटो होतोय व्हायरल!

बॉलिवूडपासून (Bollywood) ते हॉलिवूडपर्यंत (Hollywood) जिची चर्चा असते अशी अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) नेहमी सोशल मीडियावर (Social Media) सक्रीय असते. ती नेहमी स्वत:चे, कधी पती सोबत तर कधी मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच प्रियंकाने पती निक जोनाससोबतचा (Nick Jonas) एक फोटो शेअर केला आहे. प्रियंका पतीसोबत लंडनमधील मार्केटमध्ये शॉपिंग करतानाचा हा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रियांका चोप्राने लॉस एंजेलिसमध्ये निक जोनाससोबतचा एक सेल्फी शेअर केला आहे. नुकताच प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर हा फोटो शेअर केला. हा फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. या फोटोमध्ये दिसत आहे की, प्रियंका आणि निक दोघेही शॉपिंग करत आहेत. आउटिंगसाठी प्रियांकाने काळ्या रंगाची कपडे परिधान केला होता आणि चेहऱ्यावर मास्क लावला होता. तर निकने राखाडी रंगाची कपडे परिधान करत टोपी घातली आहे.

लंडनच्या सुपरमार्केटमध्ये निक आणि प्रियांका दिसले. फोटोमध्ये दिसत आहे की, निक जोनास प्रियांकाच्या हेअरकेअर प्रोडक्टकडे बोट दाखवताना दिसत आहे. सुपरमार्केटमधील स्टोअरमध्ये शेल्फवर प्रियांकाचा फोटो असलेले हेअरकेअर प्रोडक्ट ठेवले आहे. निक सेल्फी काढताना त्या प्रोडक्टकडे बोट दाखवताना दिसत आहे. प्रियांकाने 2021 मध्ये तिचे हेअरकेअर प्रोडक्ट लाइन अनोमली लाँच केले होते.

प्रियांका नेहमी निक आणि तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. अलीकडेच तिने निकसोबत मेक्सिको सिटीला प्रवास केला आणि जोनास ब्रदर्ससोबत त्यांच्या कॉन्सर्टमध्येही भाग घेतला. निक जोनास आणि प्रियांका चोप्रा यांनी 2018 साली लग्न केले. लग्नानंतर प्रियांका पतीसोबत लॉस एंजेलिसमध्ये राहत आहे. लग्नानंतर दोघांनी दिल्ली आणि मुंबईत दोन रिसेप्शनही आयोजित केले होते. त्यानंतर जानेवारी 2022 मध्ये प्रियांका आणि निक सरोगसीद्वारे गोंडस मुलीचे पालक झाले.

प्रियंका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, प्रियंका लवकरच इट्स ऑल कमिंग बॅक टू मी सारख्या हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. याशिवाय प्रियांका रुसो ब्रदर्सच्या ‘सिटाडेल’ या नव्या सीरिजमध्येही दिसणार आहे. त्याचबरोबर प्रियका चोप्रा फरहान अख्तरच्या आगामी ‘जी ले जरा’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आलिया भट्ट आणि कतरिना कैफ देखील काम करणार आहेत.

Join our WhatsApp group