Friday, March 29, 2024
Homeजरा हटकेUrfi Javed चा नवा अवतार, परिधान केला 2000 सिमकार्डपासून तयार केलेला ड्रेस

Urfi Javed चा नवा अवतार, परिधान केला 2000 सिमकार्डपासून तयार केलेला ड्रेस

अभिनेत्री उर्फी जावेद (Actress Urfi Javed) आपल्या अतरंगी ड्रेस आणि स्टाइलमुळे नेहमी सोशल मीडियावर ( चर्चेत असते. उर्फीसारख्या ड्रेसमध्ये आतापर्यंत क्वचितच तुम्हाला कोणी सेलिब्रिटी दिसले असतील. कोणत्याही वस्तूपासून डिझाइन केलेले ड्रेस परिधान करून उर्फी कॅमेऱ्यासमोर येत असते. कधी ब्लेड, कधी न्यूज पेपर, कधी फोटो, कधी पॉलिथिनपासून तयार केलेले ड्रेस परिधान करुन उर्फीने आपला जलवा दाखवला. आता तर चक्क उर्फीने जरा हटके आणि सर्वांना विचार करायला लावणारा ड्रेस परिधान केला आहे. आता तर उर्फीने सिमकार्डपासून तयार केलेला ड्रेस परिधान केला आहे. उर्फी जावेदचे या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

उर्फीने सोशल मीडियावर सिमकार्डपासून तयार केलेला क्रॉप टॉप आणि स्कर्ट घातलेला फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तसेच या हटक्या ड्रेसमधील व्हिडिओ शेअर करून तिने सर्वांना धक्का दिला. उर्फीचा फॅशन सेन्स कमालच आहे. ती कशापासून तयार केलेले ड्रेस परिधान करेल हे सांगता येत नाही. उर्फी जावेदने पुन्हा एकदा आपल्या ड्रेसने सर्वांना आश्चर्य चकित केले आहे. उर्फी कधी कधी अशा ड्रेसमध्ये दिसत आहे ज्याची आपण कल्पनाही करु शकत नाही.

उर्फी जावेदने 2000 सिमकार्डपासून तयार केलेल्या पिवळा आणि निळा रंगाचा ड्रेस घालून फोटोशूट केले आहे. उर्फी जावेदने सिमकार्डपासून तयार केलेला क्रॉप टॉप आणि शॉर्ट स्कर्ट घातला आहे. निळ्या आणि पिवळ्या या स्ट्रॅपच्या टॉप आणि स्कर्टमध्ये उर्फी खूपच आकर्षक दिसत आहे. या ड्रेसमधील फोटो उर्फीने आपल्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की ‘हे सिमकार्डपासून तयार केले आहे यावर विश्वास ठेवू शकतो का?’.

उर्फीचा हा ड्रेस कुढून आला आणि तिला कोणी दिला असा प्रश्न सर्वांना पडला असेल. तर उर्फीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. त्यामधून तुम्हाला या ड्रेसबद्दल सर्वकाही कळेल. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ती पांढऱ्या रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये फोटोशूट करत आहे. दरम्यान, एक मुलगा आणि मुलगी तिथे येतात, त्यांनी उर्फीला सांगितले की तिच्यासाठी डिझायनर ड्रेस तयार केला आहे. 2 हजार सिमकार्डपासून तयार केलेला हा ड्रेस पाहून उर्फी खूश होतो आणि तो परिधान करते. खरं सांगायचे झाले तर हा व्हिडिओ ‘जमतारा’ सीझन 2 च्या प्रमोशनचा आहे. ज्यामध्ये स्टायलिश ड्रेसच्या नावावर उर्फी जावेदची फसवणूक झाल्याचे सांगण्यात येत आहे. Urfi चा मजेदार प्रमोशनल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -