Friday, March 29, 2024
Homeनोकरीपोलिस भरतीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, उपमुख्यमंत्र्यांकडून महत्वाची घोषणा….

पोलिस भरतीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, उपमुख्यमंत्र्यांकडून महत्वाची घोषणा….

पोलिस भरतीचे स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता. 26) पोलिस भरतीबाबत मोठी घोषणा केल्याने तरुणांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. महाराष्ट्रातील सायबर सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला..

पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की “राज्यातील पोलिस दलात पुढील 2 वर्षात 20 हजार जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. यापूर्वी पोलिस दलात सात ते आठ हजार जागांची भरती करण्याबाबत जाहीरात काढली होती. त्यात आता आणखी 12 हजार जागांची भर पडणार असून, लवकरच या भरतीची जाहीरात काढली जाईल.”

‘राज्यात अनेक सायबर गुन्हे घडत आहेत. फिशिंगच्या माध्यमातून लोकांना लुटले जात आहे, त्यांना त्रास दिला जातोय. यासाठी सरकार योग्य ती कारवाई करीत असून, लवकरच राज्यात सायबर सिक्युरीटीचे रोबस्ट इन्फ्रास्ट्रक्चर उभारणार आहोत. तसेच, जागरुकतेसाठी एक कॅम्पेनदेखील हाती घेणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले..

ते म्हणाले, की “जेल विभागातही सुधारणांची गरज आहे. सध्या 1641 कैद्यांची बेल झाली आहे. परंतु, बेल बॉन्डसाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याने ते जेलमध्ये आहेत. अशा कैद्यांना कायदेशीर मदत केली जाईल. त्यांना जेलमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जातील. यासाठी काही सामाजिक संस्थांची मदत घेणार आहोत..”

नवरात्रीमध्ये दोन दिवस मध्यरात्री 12 वाजेपर्यंत दांडिया खेळण्याची परवानगी देण्यात येणार आहे. तसेच, तिसऱ्या दिवशीही मध्यरात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले..

‘फॉक्सकॉन’वरून टीका

‘वेदांत’च्या ‘फॉक्सकॉन’ प्रकल्पावरून फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. ते म्हणाले, की “संबंधित कंपनीला महाविकास आघाडी सरकारने प्रकल्पासाठी जागा दाखवली नव्हती. शिवाय एकही कॅबिनेट बैठक घेतली नाही. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही त्यांना आवश्यक असणारी जागा दाखवली.”

हा प्रकल्प गुजरातला जातोय, असे समजल्यानंतर आम्ही कॅबिनेटची बैठक घेऊन गुजरातपेक्षा जास्त सुविधा देत असल्याचे त्यांना सांगितले. कॅबिनेटीमधून मंजूर केलेलं पॅकेजही आम्ही त्यांना दाखवले. महाविकास आघाडीच्या काळात ‘वेदांत’ प्रकल्पाबाबत काहीच झालं नसल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -