टीम इंडियाकडे आज मालिकाविजयाची संधी, अशी असेल प्लेइंग इलेव्हन

ताजी बातमी ऑनलाईन टीम

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने जिंकला. त्यानंतर आता आज गुवाहाटीतील सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाला मालिका काबीज करण्याची संधी आहे. या मालिकेपूर्वी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला असून जसप्रीत बुमराहसारख्या काही महत्त्वाच्या खेळाडूंना वगळल्यानंतरही भारतीय संघ चांगल्या फॉर्ममध्ये आणि लयीत दिसत आहे. दुसरा T20 सामना कधी आणि किती वाजता होणार? तुम्ही तो कसा पाहू शकता? हे जाणून घेऊया.कधी आणि कुठे होणार सामना?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन टी-20 सामन्यातील दुसरा सामना आज (02 ऑक्टोबर) होणार आहे. हा सामना गुवाहाटी येथील बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल परंतु नाणेफेक अर्धा तास आधी संध्याकाळी 6.30 वाजता होईल.वेगवान गोलंदाजी कॉम्बिनेशन?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Ind Vs SA T20) दुसऱ्या T20 सामन्यात सर्व भारतीय चाहत्यांच्या नजरा टीम इंडियाच्या प्लेइंग 11 वर असतील. फलंदाजीतील फारसे बदल होणार नाहीत, मात्र वेगवान गोलंदाजांसाठी कर्णधार रोहित शर्माला आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासमोर खेळाडू निवडण्याचं आव्हान असेल. टीम इंडिया मालिका जिंकण्याच्या उद्देशाने आज मैदानात उतरेल. त्यामुळे विजयी प्लेइंग इलेव्हन असणे खूप गरजेचं आहे. कर्णधार रोहित मोहम्मद सिराजवर विश्वास ठेवतो का? हे देखील पहावं लागेल.

Join our WhatsApp group