Friday, April 19, 2024
Homeमनोरंजन'बिग बॉस' मराठीच्या चौथ्या सीझनची धडाक्यात सुरुवात, 'देवमाणूस' फेम अभिनेत्री पहिली स्पर्धक!

‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या सीझनची धडाक्यात सुरुवात, ‘देवमाणूस’ फेम अभिनेत्री पहिली स्पर्धक!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

एक घर…१०० दिवस…१६ स्पर्धक, २४ तास तुमच्यावर शेकडो कॅमेरांची नजर आणि याच आधारावर कोट्यवधी प्रेक्षकांकडून केली जाणार तुमची पारख…असा आगळावेगळा भन्नाट रियालिटी शो म्हणजे Bigg Boss! हिंदीत हा शो सुपरहिट झाल्यानंतर काही वर्षांपूर्वी मराठीतही सुरू झाला. मराठी प्रेक्षकांनीही या कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद दिला. आज बिग बॉस मराठीचं चौथं सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. शोचे सुत्रसंचालक महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत आज बिग बॉस मराठी सीझन-४ चा ग्रँड प्रीमअर सुरू आहे आणि यंदाच्या सीझनमध्ये घरात पहिलं पाऊल ठेवण्याची संधी अभिनेत्र तेजस्विनी लोणारी पहिला प्राप्त झाली आहे.



अभिनेत्री तेजस्विनी लोणारी ही गेली १४ वर्ष मनोरंजन क्षेत्रात काम करत आहे. ‘झी मराठी’वरील ‘देवमाणूस’ मालिकेत तेजस्विनी आमदार बाईंच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. याच भूमिकेच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली. याशिवाय तिनं चिनू, गुलदस्ता यांसारख्या चित्रपटातही काम केलं आहे. घरात दाखल होण्याआधीच तेजस्विनीला पहिली ड्युटी ‘बिग बॉस’नं दिली आहे. ‘बिग बॉस’च्या घरात तेजस्विनीला स्वयंपाक घराची जबाबदा मिळाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -