Friday, April 19, 2024
Homeतंत्रज्ञानया 5 Electric Scooter लवकरच होणार लॉन्च, दमदार फीचर्स आणि किंमत ऐकल्यावर...

या 5 Electric Scooter लवकरच होणार लॉन्च, दमदार फीचर्स आणि किंमत ऐकल्यावर म्हणाल घेतली तर हिच घेणार!



सध्या देशात एकापाठोपाठ एक नवनवीन इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करण्यात येत आहेत. देशामध्ये पट्रोलच्या किमती वाढत असल्यामुळे इलेक्ट्रिक स्कूटर्सला लोकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. लोकांचा इलेक्ट्रिक स्कूटर्सला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता आता सर्वच कंपन्या नवनवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स मार्केटमध्ये घेऊन येत आहेत. दमदार फीचर्स आणि कमीत कमी किमतीमध्ये या स्कूटर्स उपलब्ध करुन दिल्या जात आहेत त्यामुळे ग्राहक चांगलेच आकर्षित होत आहेत. अशामध्ये जर तुम्ही सुद्धा इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण लवकरच 5 दमदार फीचर्ससह इलेक्ट्रिक स्कूटर्स मार्केटमध्ये लॉन्च होणार आहेत.

इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात येऊन वर्षभराहून अधिक काळ झाला आहे. तेव्हा नामवंत कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लवकरच अनेक मोठ्या कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर भारतात आणणार आहेत. यामध्ये हिरो, सुझुकी, यामाहा आणि होंडासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. तसेच या इलेक्ट्रिक स्कूटर्सवरील खर्च खूप कमी असणार आहे. या स्कूटर्स चार्ज करण्यासाठी 10 युनिट्सपेक्षा कमी खर्च येईल. म्हणजेच तुम्ही अवघ्या 50 रुपयांमध्ये स्कूटर फुल चार्ज करू शकता आणि त्यानंतर 100 ते 200 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकता. अशामध्ये या 5 नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स कोणत्या आहेत, त्याचे वैशिष्ट्य, फीचर्स आणि किंमत आपण आज जाणून घेणार आहोत…

हिरो वीडा (Hero Vida Electric Scooter) –
हिरो कंपनी हे एक दुचाकी उत्पादक, भारतातील एक अतिशय विश्वासार्ह नाव आहे. अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकी दीर्घकाळापासून बाजारात लॉन्च केल्या जात आहेत. असे असताना हिरो कंपनीने अद्याप एकही इलेक्ट्रिक बाइक आणि स्कूटर मार्केटमध्ये लॉन्च केली नव्हती. पण आता हिरो कंपनी आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Hero Vida Electric Scooter मार्केटमध्ये लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे. 7 ऑक्टोबर रोजी Hero MotoCorp आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. कंपनी आपली इलेक्ट्रिक स्कूटर विडा ब्रँड अंतर्गत सादर करणार आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी 2022 च्या अखेरीस सुरू होण्याची अपेक्षा आहे. या स्कूटरची किंमत 1 लाख रुपये ते 1.25 लाख रुपयांच्या दरम्यान ठेवली जाईल. ही एक्स शोरूम किंमत आहे. ही ई-स्कूटर 120 ते 160 किलोमीटर पर्यंतची रेंज देऊ शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -