Homeमहाराष्ट्रट्रक आणि टाटा मॅजिकची नांदेड येथे भीषण धडक, आठ जणांचा मृत्यू झाल्याचा...

ट्रक आणि टाटा मॅजिकची नांदेड येथे भीषण धडक, आठ जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज

भोकरहून नांदेड येथे जाणाऱ्या भरधाव ट्रकने टाटा मॅजिकला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. नांदेड ते भोकर महामार्गावरील वाकद गावाजवळ गुरुवारी सायंकाळी हा अपघात घडला आहे. एकीकडे बैलपोळा सण साजरा केला जात असताना ही भीषण दुर्घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहेत.

 

भोकरकडून नांदेडच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या भरधाव ट्रकने टाटा मॅजिकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या या भीषण अपघातात सहा जण ठार झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.या अपघाताबद्दल शासकीय यंत्रणेने अद्याप किती जण मृत पावले आहेत याची अधिकृत माहिती दिलेली नाही. या अपघातात सात ते आठ जण गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.

 

नांदेड ते भोकर महामार्गावरील वाकद गावाजवळ हा भीषण अपघात झाला असून ट्रक चालक अपघातानंतर ट्रकमध्येच अडकला आहे. या ट्रक चालकाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या अपघातातील जखमींना भोकरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जखमीमधील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.

 

मृतांचा आकडा वाढण्याची भीती

गुरुवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील सीताखंडी घाटाजवळ ही दुर्दैवी घटना घडली. ट्रक आणि टाटा मॅजिकची धडक इतकी जोरदार झाली की टाटा मॅजिकचा चक्काचूर झाला आणि अनेक प्रवासी वाहनातच अडकून पडले होते. मृतांमध्ये एका दामप्त्याचा समावेशही आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे बैलपोळ्याचा सण सर्वत्र साजरा केला जात असताना इतका मोठा अपघात घडल्याने नांदेड येथे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -