महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इचलकरंजी आगाराच्या ताफ्यात 5 नवीन अत्याधुनिक राजमाता जिजाऊ बसेस दाखल झाल्या आहेत. नव्याने दाखल पाच अत्याधुनिक बसेसचा लाेकार्पण साेहळा श्री शिवतीर्थ मध्यवर्ती बसस्थानक येथे मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडला. आमदार राहुल आवाडे यांनी या संदर्भात शासन दरबारी पाठपुरावा केला हाेता. यावेळी या बसमधून मान्यवरांची शहरातून ेरफटकाही मारला.
प्रारंभी इचलकरंजी आगार व्यवस्थापक नरेंद्र बाेधे यांनी स्वागत केले. आमदार राहुल आवाडे, उपमहापाैर अनिल डाळ्या, स्थायी सभापती सतीश मुळीक व परिवहन सभापती साै. अरुणा बचाटे यांच्या हस्ते हा लाेकार्पण साेहळा पार पडला. या नवीन अत्याधुनिक बसेसमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व सुरक्षित हाेणार असल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले.
याप्रसंगी समाज कल्याण समिती सभापती रुबन आवळे, रुपाली सातपुते, ध्रुवती दळवाई, सपना भिसे, राजू बोंद्रे, नितेश पोवार, अभिषेक वाळवेकर, योगेश पाटील, मारुती पाथरवट, राजू पुजारी, बाळासाहेब कलागते, विनय महाजन, अमृत भोसले, प्रमोद बचाटे,
आगाराचे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक सुहास चव्हाण, सहाय्यक वाहतूक अधीक्षक श्रीमती शिल्पा थाेरात, वाहतूक निरीक्षक राेहन कांबळे, पर्यवेक्षक आनंदा दाेपारे यांच्यासह चालक, वाहक, कार्यशाळा व प्रशासकीय कर्मचारी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. सूत्रसंचालन वरिष्ठ लिपिक परेश पई यांनी केले. तर श्रीमती दिपाली सवाईराम, श्रीमती उत्कर्षा सुतार आणि श्रीमती स्वाती कारदगे यांनी सुरेख नियाेजन केले.
