राज्यातील एसटी बस प्रवासातील सवलतीचा लाभ घ्यायला असेल तर जेष्ठ नागरीक आणि महिलांना NCMC Card बंधनकारक करण्यात आले आहे.1 सप्टेंबरपासून याची अंमलबजावणी सुरु झाल्यामुळे एसटी महामंडळाच्या प्रत्येक आगारात महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा लागलेल्या दिसतात.
त्यात सर्व्हर बंद पडणे, तांत्रिक अडचणी, बायोमेट्रिक आधार कार्डला जोडणी, ओटीपी आणि रिचार्जद्वारे कार्ड टॉपअप करणे यामुळे प्रवाशांची प्रचंड धावपळ सुरू आहे.
पण तुम्हाला माहितीय का NCMC Card Recharge तुम्ही घरबसल्या देखील करु शकता. हे रिचार्ज नेमकं कसं करायचं? हे जाणून घेऊयात.
सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर जाऊन mtpcardonline.nsdlpayment.bank.in या साईटवर जायचं आहे. साईट ओपन होताच तुम्हाला NSDL Payment Bankच पेज ओपन होईल.
पेज ओपन होताच तुम्हाल मोबाईल नंबर विचारला जाईल. त्यामुळे तुम्ही NCMC Card काढताना जो मोबाईल नंबर दिलेला तो मोबाईल नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे.
लॉगिन झाल्यानंतर तुमचं NCMC Card ऑनलाईन दाखवलं जाईल.त्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला Wallet Recharge हा पर्याय दाखवला जाईल.
या पर्यायावर क्लिक करताच तुम्हाला 50,100,200,500,1000,2000 आणि 3000 पर्यंत असे रिचार्ज करता येणार आहे.
तुम्ही तुमची रक्कम टाकल्यानंतर Proceed To Pay बटणावर क्लिक करा. त्यानंतर पुन्हा Confirm & Pay वर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला पैसे ऑनलाईन भरण्यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि UPI असे पर्याय दिले जातील.त्यामुळे तुमच्या सोयीनुसार पर्याय निवडा आणि पेमेंट करा.
अशाप्रकारे घरबसल्या आणि डेपोत रांग न लावता तुमचं NCMC Card रिचार्ज होणार आहे.
