Homeमहाराष्ट्रUPI नंतर आता ATM कॅश विड्रॉलवरही चार्ज! 1 ऑक्टोबरपासून नवा नियम

UPI नंतर आता ATM कॅश विड्रॉलवरही चार्ज! 1 ऑक्टोबरपासून नवा नियम

देशभरात 15 ऑक्टोबरपासून UPI व्यवहारांवर MDR चार्ज लागू होण्याच्या चर्चेदरम्यान आता देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या SBI ने ग्राहकांसाठी महत्त्वाचा बदल केला आहे.

 

1 ऑक्टोबर 2026 पासून SBI मधून कॅश काढण्याच्या नियमांमध्ये बदल होणार असून, ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास आता अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार आहे.

 

SBI चा हा नवा नियम सर्व खातेदारांना लागू होणार नाही. शाखेतून उघडण्यात आलेल्या Basic Savings Bank Deposit (BSBD) Account म्हणजेच ‘झिरो बॅलन्स बचत खाते’ ज्यांचे आहे त्या ग्राहकांसाठी हा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे तुमचे SBI मध्ये BSBD खाते असेल आणि तुम्ही वारंवार ATM किंवा इतर माध्यमातून रोख रक्कम काढत असाल, तर 1 ऑक्टोबरपासून लागू होणारे नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

 

किती वेळा पैसे काढणे मोफत?

 

SBI ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर दिलेल्या माहितीनुसार, BSBD खातेदारांना महिन्यात 4 वेळा मोफत कॅश काढण्याची सुविधा मिळत राहणार आहे. मात्र, 4 व्यवहारांची मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक अतिरिक्त कॅश विड्रॉलसाठी 15 रुपये शुल्क आकारले जाईल. त्यावर लागू असलेला GST देखील ग्राहकांना भरावा लागेल.

 

म्हणजेच, महिन्यात चार वेळा पैसे काढण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. मात्र, त्यानंतर प्रत्येक अतिरिक्त रोख व्यवहारासाठी ग्राहकांच्या खात्यावर शुल्क आकारले जाईल.

 

डिजिटल व्यवहारांवर शुल्क नाही

SBI च्या माहितीनुसार, या बदलाचा डिजिटल व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही. ग्राहक नेहमीप्रमाणे UPI आणि इतर डिजिटल माध्यमातून पूर्वीप्रमाणे व्यवहार करू शकतील. डिजिटल व्यवहारांच्या संख्येवरही या नियमामुळे कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही.

 

आधार व्यवहारांवरही चार्ज

 

SBI ने Aadhaar Enabled Payment System (AePS) च्या कॅश विड्रॉलशी संबंधित नियमांमध्येही बदल केला आहे. यापूर्वी आधारचा वापर करून पैसे काढलेल्या व्यवहारांना डिजिटल व्यवहार मानले जात असल्याने ते महिन्यातील 4 मोफत कॅश विड्रॉलच्या मर्यादेत मोजले जात नव्हते. मात्र, आता ही सवलत काढून घेण्यात आली आहे. त्यामुळे AePS च्या माध्यमातून केले जाणारे कॅश विड्रॉलदेखील नव्या शुल्काच्या नियमांनुसार मोजले जातील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -