Homeसांगली‘कृष्णा-कोयनाकाठ’च्या पिकांवर संकट; पीक पाहणीचा अहवाल सादर

‘कृष्णा-कोयनाकाठ’च्या पिकांवर संकट; पीक पाहणीचा अहवाल सादर

राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ पंचनाम्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. तत्पूर्वीच पीक नुकसानीचा अहवाल कृषी विभागाकडून प्रशासनास सादर करण्यात आला असून तो अहवाल ‘लोकमत’च्या हाती लागला आहे. त्यामध्ये चौदा मंडळांतील जिरायती पिकांमध्ये ६० ते ७० टक्के आणि बागायती पिकांमध्ये २० ते २५ टक्के घट होण्याची शक्यता तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दि. २१ सप्टेंबर रोजी सादर केलेल्या अहवालातून स्पष्ट केली आहे.

 

कराड मंडल : पावसाअभावी ऊस लागवड थांबली.

उंब्रज मंडल : डोंगर भागातील पिके सुकली.

इंदोली मंडल : पूर्व हंगामी उसाची लागवड थांबली.

सुपने मंडल : भात पिवळा पडला असून सोयाबीन पीक सुकले.

मसूर मंडल : भुईमूग, सोयाबीन पिके सुकली.

कवठे मंडल : भात पिवळा पडला असून जिरायती पिकात ५०-६० टक्के घट होण्याची शक्यता.

कोपर्डे हवेली मंडल : भात पिवळा पडला असून ज्वारी सुकली आहे.

सैदापूर मंडल : भात पीक पिवळे पडले, सोयाबीन सुकले आहे.

शेणोली मंडल : भात पिकावर करपा रोग आहे. उपसा बंदीमुळे संरक्षित पाणी पिकांना नाही.

कोळे मंडल : सोयाबीन पिके सुकली आहेत.

उंडाळे मंडल : सोयाबीन सुकू लागले आहे.

काले मंडल : डोंगर भागातील पिके सुकली आहेत.

मलकापूर मंडल : भात पिकावर करपा दिसून येतोय.

येळगाव मंडल : भात पिवळा पडलेला आहे.

 

मंडलनिहाय पावसाची स्थिती

 

– कराड : ४९७.५० मिमी — ९० टक्के; १८ दिवस खंड

– उंब्रज : ५०९.१० मिमी — ९२.१० टक्के; १८ दिवस खंड

– इंदोली : ४२९.१० मिमी — ७७.६० टक्के; २२ दिवस खंड

– सुपने : ६२६.६० मिमी — ११३.३० टक्के; १४ दिवस खंड

– मसूर : ३५६ मिमी — ६४.४० टक्के; १८ दिवस खंड

– कवठे : ४९५.५० मिमी — ८९.६० टक्के; १७ दिवस खंड

– कोपर्डे हवेली : ४६२.४० मिमी-८३.७० टक्के; १८ दिवस खंड

– सैदापूर : ४८५.९० मिमी — ८७.९० टक्के; ६ दिवस खंड

– शेणोली : ४८६.२० मिमी — ८७.९० टक्के; १३ दिवस खंड

– कोळे : ४५५.७० मिमी — ८२.४० टक्के; ८ दिवस खंड

– उंडाळे : ४९८.७० मिमी — ९२.२० टक्के; १९ दिवस खंड

– काले : ४५७.४० मिमी — ८२.७० टक्के; २२ दिवस खंड

अहवालात शेतीवरीलपाणीटंचाईची माहिती

 

कृष्णा व कोयना नदीकाठच्या गावांमध्ये दि. १९ सप्टेंबरपासून उपसा बंदी लागू झाल्याने संरक्षित पाण्याचा पुरवठा थांबला आहे. पाण्याची सुविधा असलेल्या काही ठिकाणी लोडशेडिंगमुळे दिवसातून केवळ दोन ते तीन तास संरक्षित पाणी देता येत असल्याचे अहवालात नमूद आहे.

 

कराड तालुक्यात बारा मंडळांतील झालेल्या पीक नुकसानीचे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. पीक पाहणी व नुकसानीचा अहवाल दि. १९ रोजी वरिष्ठांकडे पाठवला असून तालुक्यातील पीक नुकसानीची संपूर्ण माहिती त्यांना दिलेली आहे. – प्रशांत शेंडे, तालुका कृषी अधिकारी, कराड

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -