Homeराशी-भविष्यआजचे राशीभविष्य - २ ऑक्टोबर २०२६

आजचे राशीभविष्य – २ ऑक्टोबर २०२६

मेष: आज स्वतःबद्धलचे विचार बाजूला ठेवून इतरांचा विचार करावा लागेल. कुटुंबीयांसाठी काही विशेष काम व व्यवहार करावे लागतील. इतरांशी वाद व मतभेद टाळण्यासाठी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल.भोजन नेहेमीच्या वेळेस घेता येणार नाही.

 

वृषभ – आजचा आपला दिवस मध्यम फलदायी आहे. दिवसाच्या सुरवातीस शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. कलेस वाव मिळेल.

 

मिथुन – आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. हाती घेतलेली कामे अपूर्ण राहतील. शारीरिक अस्वास्थ्य व मानसिक व्यग्रता जाणवेल. दुपार नंतर कामाचा उत्साह वाढेल.

 

कर्क – आजचा दिवस व्यापारासाठी लाभदायी आहे. एखाद्या सहलीचा बेत आखू शकाल. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. डोळ्यांच्या विकाराचा त्रास सतावेल.

 

सिंह – आजचा दिवस नवीन कार्यारंभास शुभ फलदायी आहे. हाती घेतलेली कामे पूर्ण होतील. मित्र व स्नेह्यांकडून भेटवस्तू मिळतील. नवीन ओळखींचा भविष्यात व्यापारासाठी लाभ होण्याची शक्यता आहे.

 

कन्या – आज आपणास आपल्या व्यवसायात धनलाभ होईल. दूरवरचे प्रवास करू शकाल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. परदेशस्थ स्नेह्यांकडून एखादी चांगली बातमी मिळेल. दुपार नंतर नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

तूळ – आळस व कामाचा व्याप ह्यामुळे मन व्याकुळ होईल. नियोजित वेळेत कार्य पूर्ण करू शकाल. प्रकृतीकडे लक्ष देण्याच्या दृष्टीने बाहेरील पदार्थ खाऊ नका. प्रवासात अडचणी येतील. पण दुपार नंतर मात्र परदेशस्थ मित्र व संबंधितांकडून काही चांगली बातमी आल्याने आपला आनंद द्विगुणित होईल.

 

वृश्चिक – आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. वैवाहिक जीवनात सुख व समाधान प्राप्त होईल. आप्तांसह सामाजिक समारंभात सहभागी होऊ शकाल. एखादा प्रवास संभवतो. दुपार नंतर आरोग्य विषयक तक्रारी उदभवतील. आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.

 

धनु – आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले नसतानाही प्रलंबित कामे आपण पूर्ण करू शकाल. आर्थिक नियोजन करण्यात यशस्वी व्हाल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. आप्तेष्टांशी जवळीक वाढेल.

 

मकर – आपल्या वक्तृत्व शैलीने इतरांना प्रभावित कराल. गोड बोलून नवीन संबंध प्रस्थापित करू शकाल. आर्थिक नियोजनात यशस्वी व्हाल. नोकरीत सर्वांचे सहकार्य मिळवू शकाल.

 

कुंभ – विद्यार्थी, कलाकार व खेळाडू ह्यांच्यासाठी आजचा दिवस शुभ फलदायी आहे. पिता व शासनाकडून काही लाभ होऊ शकेल. खंबीर मनोबलामुळे कार्यपूर्ती होण्यात कोणतीही आडकाठी येणार नाही.

 

मीन – आजचा दिवस काल्पनिक विश्वात घालवाल. सृजनशीलतेला अचूक दिशा मिळेल. कुटुंबीय व मित्रांसह मेजवानीचा बेत ठरवू शकाल. दैनंदिन कामे आत्मविश्वास व एकाग्रचित्ताने पूर्ण करू शकाल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -