येधील सेंडूरे कॉलेजसमोर भरधाव दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या विलास केरवा बागडी (वय ५७, रा. कुजूर, ता. निपाणी, जि. बेळगाव) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी दुचाकीचालक सौरभ अशोक पुंदे (रा. रामनगर रेंदाळ, ता. हातकणंगले) याच्याविरुद्ध हुपरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास विलास बागडी हे सेंडूरे कॉलेजसमोरील रस्ता ओलांडून रेंदाळच्या दिशेने पायी जात होते. त्यावेळी सौरभ पुंदे याने भरधाव वेगाने दुचाकी चालवत बागड़ी यांना पाठीमागून धडक दिली.
अपघातात विलास बागडी हे सत्यावर जोराने आपटल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने हुनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व त्यानंतर पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत संदिप विलास बागड़ी (रा. कुजूर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दुचाकी चालक सौरभ पुढे बाच्या विरुध्द गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे करत आहेत.

