Homeमहाराष्ट्रज्याची भीती तेच घडले, राज्यात ऑक्टोबर हीट, भारतीय हवामान विभागाचा थेट अलर्ट..

ज्याची भीती तेच घडले, राज्यात ऑक्टोबर हीट, भारतीय हवामान विभागाचा थेट अलर्ट..

राज्यातून मॉन्सूनचा पाऊस गायब झाला. राज्यात यंदा पाऊस कमी झाला. अनेक ठिकाणी दुष्काळीची स्थिती आहे. शेतकरी चिंतेत आहे. सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर केला. शेतकऱ्यांना मदत सरकारकडून केली जात आहे. यासोबतच शेतकऱ्यांना कर्जाचा हप्ता भरण्यासाठी तगदा न लावण्याच्या सूचनाही राज्य सरकारने दिल्या. त्यातच आता पावसाने माघार घेतल्यानंतर ऑक्टोबर महिन्यातच हीट वाढली आहे. मुंबईत पारा 36 अंशांवर पोहोचला आहे. ऑक्टोबर सुरू होताच राज्यात उष्णतेचा चटका जाणवू लागला आहे. मुंबईत रविवारी कमाल तापमान 36.1 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. हे तापमान सरासरीपेक्षा 2.5 अंशांनी अधिक आहे. त्यामुळे सकाळच्या तुलनेत दुपारनंतर मुंबईकरांना उन्हाचा चांगलाच तडाखा जाणवत आहे.

 

दरम्यान, अकोला येथे सर्वाधिक 37.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यातही उष्णता जाणवत असून छत्रपती संभाजीनगर येथे 36 अंश, परभणी 35.3 अंश आणि धाराशिव 33.1 अंश कमाल तापमान नोंदविण्यात आले. विदर्भात ऑक्टोबर हिटचा प्रभाव अधिक जाणवत असून अकोला येथे 37.1 अंश तापमानाची नोंद झाली. अमरावती 36.4, चंद्रपूर 36.4, वर्धा 36, बुलढाणा 35.2, ब्रह्मपुरी 35.2, नागपूर 35 आणि वाशिम 35 अंश अशा तापमानाची नोंद झाली.

 

राज्यातून मॉन्सून गेला मात्र त्यानंतर उष्णता प्रचंड वाढली आहे. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. स्थिती गंभीर आहे, पिण्याच्या पाण्याचा विषय गंभीर आहे. पाऊस पाणी नसल्याने लोकांना रोजगार मिळत नाहीये. कामासाठी लोक शहरंकडे येत आहेत. दुष्काळाचा फटका मोठ्या प्रमाणात शेतमजुरांना मिळतोय. शेतमजुरांचे दसरा-दिवाळीपूर्वीच स्थलांतर सुरू झाले. सोयाबीन, कापूस पिके हातची गेल्याने ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. शेतात काम नसल्याने मजूर कुटुंबांसह पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होत आहेत.

 

सोनपेठमधून पुण्यासाठी जाणाऱ्या खासगी बसमध्ये स्थलांतरित मजुरांचे प्रमाण वाढले आहे. बालाघाट आणि अजिंठा डोंगररांगांतील गावांमध्ये स्थलांतराचे प्रमाण अधिक आहे. ऑक्टोबर महिन्यात हीट वाढली आहे. मुंबईसह कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. राज्यातील इतरही भागात उन्हाचा चटका वाढताना दिसतोय. त्यातच हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -