Thursday, October 3, 2024
Homenewsमाजी आमदाराच्या पुतण्याच्या घरात ५३ लाखांची चोरी

माजी आमदाराच्या पुतण्याच्या घरात ५३ लाखांची चोरी


माजी आमदारांच्या पुतण्याच्या घरात ५३ लाख ४६ हजारांची घरफोडी झाली आहे. माजी आमदार रामभाऊ मोझे यांचे पुतणे हरिश्चंद्र मनोहर मोझे आणि मोहन मनोहर मोझे यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे ५३ लाख रुपयांचे सोने आणि रोख रक्कम चोरून नेले. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.

याबाबत हरिशचंद्र मोझे यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिषचंद्र मोझे आणि मोहन मोझे यांचे घर बंद होते. अज्ञात चोरट्यांनी घरावर डल्ला मारला. घराचे कुलूप तोडून हरिशचंद्र यांच्या घरातील ५३ लाख ४६ हजारांचा ऐवज लंपास केला.

सोन्या चांदीचे दागिने, महागडी घड्याळे. मोहन यांच्या घरात चोरी झाली. घरातील १३ लाख २६ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने असा ५३ लाख ४६ हजारांचा ऐवज लंपास केला.
३ ते ५ सप्टेंबर या कालावधीमध्ये ही घरफोडी झाली. घरफोडी झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -