Saturday, July 27, 2024
Homeब्रेकिंगराज्यांना सावधानतेचा इशारा ( रुग्ण संख्या अचानक वाढू शकते )

राज्यांना सावधानतेचा इशारा ( रुग्ण संख्या अचानक वाढू शकते )


कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना गंभीर इशारा दिला आहे. देशात सध्या केवळ ५ ते १० टक्के रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे. मात्र, परिस्थिती झपाट्याने बदलू शकते, असा इशारा केंद्र सरकारने दिला.

केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहिले आहे. दुसऱ्या लाटेत २० ते २३ टक्के ऍक्टिव्ह रुग्णांना हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता होती. या तुलनेत सध्या फक्त ५ ते १० टक्के अॅक्टिव्ह रुग्णांनाच हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता आहे. अशी स्थिती असली तरी अत्यंत सावध राहण्याची गरज आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -