सतरा वर्षीय मुलानेच तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना सातार्यात उघडकीस आली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी संबंधित युवकाला तत्काळ ताब्यात घेतले.
पीडित मुलगी एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून तिच्या मैत्रिणीच्या मामाच्या घराशेजारी राहणार्या युवकाने पीडित मुलीशी ‘तिची मैत्रीण बोलतेय,’ असे भासवून चॅटींग केले. पीडित मुलीला वाटले तिची मैत्रीणच तिच्याशी चॅटींग करत आहे. त्यामुळे ती सुद्धा बिनधास्तपणे चॅटींग करु लागली. मात्र काही दिवसांनी आपल्याशी चॅटिंग करणारी ही मैत्रीण नसून मुलगा आहे, हे तिला समजले.
त्यावेळी त्या तरुणाने पीडीत तरुणीला धमकी देऊन प्रेम संबंधाचे मेसेज पाठवायला भाग पाडले. मुलगा एवढ्यावरच न थांबता त्याने तिच्याशी जवळीक साधून तिला एके दिवशी राजवाड्यावरील बसस्थानकात बोलावून घेतले. तिला दुचाकीवरुन शाहूपुरी परिसरातील दिव्यानगरीतील एका खोलीत नेले. या ठिकाणी त्याने ‘तुझे कॉल रेकॉर्ड तुझ्या घरच्यांना दाखवीन’ असे ब्लॅकमेल करुन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केला.