राज्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाळी वातावरण आणि थंडीचा कडाका जाणवत आहे. तुर्तात राज्यातील नागरिकांना यातून दिलासा मिळणार नाहीये. कारण पुढील दोन दिवस हवामानात फारसा बदल होणार नाही त्यामुळे राज्यात थंडी कायम राहाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मात्र त्यानंतर किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सियसने वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
गुजरात, पंजाब, हरियाणा, छत्तीसगड राजस्थान आणि मध्य प्रदेशात थंडीचे वातावरण निर्माण झाल्याने महाराष्ट्रात देखील थंडी (Cold In Maharashtra) जाणवत आहे. राज्यात मुंबई आणि कोकण विभागासह उत्तर महाराष्ट्रातील तीन दिवसांपासून किमान तापमानात कमालीची घट झाली. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. याशिवाय मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील तापमान घटले आहे. दोन दिवसांनंतर उत्तरेकडील थंडीची लाट ओसरण्याचा अंदाज आहे. त्यामुळे त्यानंतर तापमाणात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आहे.
कर्नाटकपासून छत्तीसगडपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे काही भागात पाऊस देखील झाला. विदर्भावरही याचा परिणाम झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून विदर्भात असलले पावसाळी वातावरण आणि थंडी ( Cold and rainy weather) आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.