Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोरोणाची दिवसागणित मोठी वाढ कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी ३६९...

कोरोणाची दिवसागणित मोठी वाढ कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी ३६९ नवे कोरोना बाधित

ताजी बातमी ऑनलाईन टीम

जिल्ह्यात कोरोना बाधितांची दिवसागणित वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. आजही जिल्हयात ३६९ नवे कोरोना बाधित आढळून आले. ६८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या आता १९९३ वर पोहोचली आहे. सुदैवाने आज कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही. कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी १६६९ जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या, त्यामध्ये कोरोनाचे ३६९ नवे बाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये एकटया कोल्हापूर महानगरपालीकेमध्ये १९४ रुग्ण आढळून आले आहेत

याबरोबरच आजरा-६,च दगड -५, गडहिंग्जल-३,गगनबावडा-१, हातकणंगले-३०, कागल-२, करवीर-१७, पन्हाळा ५, राधानगरी-६,शाहुवाडी-२४, आणि शिरोळ तालुका-११ तर जयसिंगपूर नगरपरिषद-२, गडहिंग्लज नगरपरिषद -२, कागल नगरपरिषद -३, पेठ व ड गांव नगर परिषद – १, मु, र ग, ड नगरपरिषद-२ आणि अन्य जिल्ह्यातील १८ जणांचा समावेश आहे.


जिल्ह्यातील एकूण २ लाख ९ हजार २३१ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी २ लाख १ हजार ४३६ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण ५ हजार ८०२ जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या १९९३ इतकी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -