Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रसोशल मीडियावर ओळख, प्रेमीयुगल आत्महत्या करायला गेले अन्...

सोशल मीडियावर ओळख, प्रेमीयुगल आत्महत्या करायला गेले अन्…

ताजी बातमी ऑनलाइन टीम

तीस वर्षीय विवाहित महिलेसोबतएका तरुणाची फेसबुकच्‍या माध्‍यमातून ओळख झाली. दाेघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. विवाहित महिला तरुणाच्‍या थेट घरी गेली. विवाहितेच्‍या पतीने तिला फाेन करुन गुन्‍हा दाखल करण्‍याचा इशारा दिला. यानंतर या प्रेमीयुगलाने गळफास घेऊन आत्महत्या करण्‍याचा निर्णय घेतला. मात्र यावेळी दोर तुटल्‍याने विवाहित महिलेचा बचावली तर यपाल लक्ष्मण वाव्हळ ( वय २७, रा. भेंड बुद्रुक, ता. गेवराई ) यांचा मृत्‍यू झाला. ही धक्‍कादायक घटना सोमवार दि. १७ रोजी पहाटे भेंड बुद्रुक ( ता.गेवराई ) येथे घडली.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील भेंड बु. येथील जयपाल याचे कल्याण येथील एका ३० वर्षीय विवाहित महिलेसोबत फेसबुकवर प्रेमसंबंध जुळून आले. दोन दिवसांपूर्वीच ही महिला भेंड येथे आली. रविवारी दि. १६ रोजी संबंधित महिलेला तिच्‍या पतीने फोन केला. दाेघांवर गुन्हा दाखल करेन, असे बजावले. भीतीपोटी सोमवार दि. १७ रोजी पहाटे घरातील आड्याला या प्रेमी युगलाने गळफास घेतला.या वेळी दोर तुटल्‍याने विवाहित महिलेचा बचावली. तर जयपाल वाव्हळ याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. सपोनि प्रताप नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली एम. डी. कुवारे तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -