Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगउसाच्या ट्रॉलीची धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

उसाच्या ट्रॉलीची धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

मोरगाव रस्त्यावर तरडोलीनजीक झालेल्या अपघातात बारामतीतील एकाच कुटुंबातील तिघांचा दुदैवी मृत्यू झाला. मंगळवारी (दि. १८) रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. उसाच्या ट्रॉलीला मोटारीने पाठीमागून धडक दिली. त्यात मोटारीतील तिघे जागीच ठार झाले. अन्य एक महिला गंभीर जखमी झाली.

या अपघातात बारामतीतील सराफ व्यावसायिक श्रेणिक भंडारी यांची पत्नी अश्विनी भंडारी, मुलगा मिलिंद भंडारी व बहिण आणि बारामतीतील व्यापारी उदय कळसकर यांची पत्नी कविता कळसकर यांचा मृत्यू झाला. या अपघातात बिंदिया भंडारी या महिला गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले आहे.

एका धार्मिक कार्यक्रमासाठी हे सर्व जण पुण्याला गेले होते. रात्री कार्यक्रम संपवून बारामतीला निघाले होते. त्यावेळी तरडोलीपासून पुढे आल्यानंतर उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अंदाज न आल्याने मागून गाडी धडकून हा अपघात झाला. गाडीची धडक जोरदार होती. त्यामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. एक महिला यात गंभीर जखमी झाली आहे. या अपघाताने भंडारी व कळसकर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -