ताजी बातमी ऑनलाइन टीम
नवी मुंबईत नेरूळ येथील जन्मदात्यांनीच आपल्या 3 मुलांची विक्री केल्याची धक्कादायक महिती महिला व बालविकास विभागाने उघडकीस आणली आहे. या बालकांना विकण्यासाठी आई-वडिलांनी 2 लाख 90 हजार रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिसांनी आईला ताब्यात घेतले असून, घटनेची कुणकुण लागताच पिता फरार झाला आहे. नेरूळ रेल्वेस्थानकातील फलाटावर राहणारी शारदा शेख (30) ही महिला गरोदर असून तिने प्रसूतीपूर्वीच आपल्या बाळाची 2 लाखांना विक्री केल्याची माहिती आमच्या कार्यालयाला दिली होती, असे ठाणे जिल्ह्याचे महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दैनिक पुढारीला सांगितले.
शारदासोबत तिचा पती आयुब शेख राहतो, जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या बाल संरक्षण अधिकारी अॅड. पल्लवी जाधव, चाईल्ड लाईन संस्थेचे प्रतिनिधी विजय खरात, सरस्वती पागडे तसेच सामाजिक कार्यकर्ता गणेश शेळके हे या दाम्पत्यावर लक्ष ठेवून होते.
आई-वडिलांनीच केली पोटच्या 3 मुलांची विक्री
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -