Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडीरोहित पाटील म्हणतात, संघर्ष आम्हाला नवा नाही; भाजपच्या नेत्यानेही केलं अभिनंदन

रोहित पाटील म्हणतात, संघर्ष आम्हाला नवा नाही; भाजपच्या नेत्यानेही केलं अभिनंदन

नगर पंचायत निवडणुकीत दणदणीत यश मिळवल्यामुळे रोहित पाटील यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. या निमित्ताने टीव्ही 9 मराठीशी विशेष संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. हा विजय सर्वसामान्य जनतेचा आहे. या विजयाने घरचे प्रचंड आनंदी आहेत. जे काम आम्ही करतोय त्याचं त्यांना समाधान आहे. या पुढच्या काळात अधिक चांगलं काम करण्याच्या शुभेच्छाही कुटुंबाने दिल्या आहेत. आबा असते तर वेगळं मार्गदर्शन मिळालं असतं. वेगळी परिस्थिती निर्माण झाली असती. आबांनी राजकारणात 20-30 वर्ष संघर्ष केला. त्यानंतर ते शिखरावर पोहोचले होते. संघर्ष आम्हाला नवा नाही. आबा गेल्यानंतर जी परिस्थिती ओढवली होती. त्यातून आम्ही सर्व मार्ग काढत होतो. हा मार्ग काढत असताना त्यांची उणीव नेहमीच भासली. पण त्यांची शिकवण आमच्याबरोबर नेहमी होती. त्यांचे विचार आमच्यासोबत नेहमी होते. मी रक्ताचा वारसदार असलो तरी आबांनी विचाराचे वारसदार तयार केले आहेत. त्या विचारांच्या वारसदारांच्या जोरावरच आमची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे आज आबा नाहीत याची उणीव आम्हाला भासत आहे, असं रोहित म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -