Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रमहिलेवर सामूहिक बलात्कार, आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

महिलेवर सामूहिक बलात्कार, आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

विधवा महिलेचा गैरफायदा घेत तिच्यावर आठ जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन सामूहिक बलात्कार केल्याची घटना शिरुर तालुक्यता घडली आहे. याप्रकरणी शिरुर पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पाच आरोपींनी अटक केली आहे. तर अन्य तीन जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पाचही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. माऊली पवार, रज्जाक पठाण, काळू वाकुंज, विठ्ठल काळे, राजेश उर्फ पप्पू गायकवाड, आकाश गायकवाड, संदीप वाळुंज व नवनाथ वाळुंज अशी बलात्कार करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.

पीडित महिला विधवा असून घरी एकटीच राहते. महिलेच्या एकटेपणाचा आणि भोळ्या स्वभावाचा या नराधमांनी गैरफायदा घेतला. सर्व नराधम आणि पीडित महिला एकाच गावातील रहिवासी आहेत. महिला साधी असल्याने हे नराधम तिला जीवे मारण्याची धमकी देत होते. महिला घाबरुन त्यांच्या सोबत जात होती. आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार करीत होते. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. कधी घरामध्ये, शेतातील उसात, शाळेच्या पाठीमागे, नदी किनारी अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन आरोपींनी तिचा लैंगिक छळ केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -