पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.पिंपरी परिसरातील देहूगावात एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना समोर आलेली आहे. पार्टी देण्यास नकार दिल्याच्या कारणातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी जखमी युवकाने पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आकाश चंद्रकांत पाटोळे असे गुन्हा दाखल झालेल्या 28 वर्षीय आरोपीचे नाव आहे. तो देहूगाव येथील रहिवासी आहे. तर निखिल नंदनराज चव्हाण असे हल्ला झालेल्या 32 वर्षीय तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी काल गुरुवारी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
धक्कादायक; पार्टी न दिल्याने कोयत्याने वार
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -