ताजी बातमी ऑनलाइन टीम
ओमायक्राॅनच्या वंशावळीत आणखी एका व्हेरियंटची निर्मिती झाल्याने ब्रिटनच्या आरोग्य अधिकाऱ्यांना चिंता सतावत आहे. या व्हेरियंटचं नवं आहे ओमायक्राॅन बी.ए.२ असं आहे. ब्रिटनच्या आरोग्य सुरक्षा एजन्सीकडून या व्हेरियंटला इन्व्हेस्टिंग श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यावर आणखी संशोधन सुरू आहे.
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार ओमायक्राॅनचा हा नवा व्हेरियंट फ्रान्स, डेन्मार्क, भारतासह ४० देशांमध्ये पोहोचला आहे. या व्हेरियंटमध्ये व्यक्तींना अतिवेगाने संक्रमित करण्याची क्षमता आहे. ब्रिटेनने आतापर्यंत हा व्हेरियंट ४२६ प्रकरणात आढळून आला आहे. या चिंतेमध्ये आणखी एक गोष्ट समोर आली आहे की, या व्हेरियंटमध्ये ओमायक्राॅन बी.ए.१ सारखं म्युटेशन दिसत नाही. जेणेकरून त्याला डेल्टापासून वेगळी ओळख जाऊ शकेल.
डेन्मार्कच्या संशोधकांनी अंदाज वर्तविला आहे की, ओमायक्राॅन बी.ए. २ या व्हेरियंटमुळे कोरोनाची महामारी दोन भागांमध्ये (संख्यात्मक) येऊ शकते. जाॅन हाॅपकिन्समध्ये विषाणू तज्ज्ञ ब्रायन जेले यांनी चिंता व्यक्त केली आहे की, “ओमायक्राॅन बी.ए.२ हा फ्रान्स आणि डेन्मार्कच्या बाहेर संपूर्ण युरोप आणि उत्तर अमेरिकेमध्ये महामारी वाढू शकते.
आरोग्य सुरक्षा एजन्सीनुसार या व्हेरियंट भारत, स्वीडन आणि सिंगापूरसहीत ४० देशांमध्ये पसरला आहे. मात्र, सर्वांत जास्त डेन्मार्कमध्ये या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ४५ टक्के प्रकरण ही ओमायक्राॅन बी.ए. २ ची असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहेत. स्टेट सीरम इन्सिट्यूटमधील संशोधक आंद्रेस फोम्सगार्डचा यांनी दावा केला आहे की, ओमायक्राॅन बी.ए.२ या व्हेरियंटमध्ये रोग प्रतिकार क्षमता तोडण्याची क्षमतादेखील जास्त असू शकते. त्यामुळे हा व्हेरियंटमध्ये जास्त पसरू शकतो.
ओमायक्राॅन बी.ए.२’ जास्त खतरनाक ; भारतासह ४२ देशांमध्ये आढळला
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -