Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगनागपूर : 'एमपीएससी' पूर्वपरीक्षा पेपर फुटल्याचा 'अभाविप'चा आरोप

नागपूर : ‘एमपीएससी’ पूर्वपरीक्षा पेपर फुटल्याचा ‘अभाविप’चा आरोप

ताजी बातमी ऑनलाईन टीम

राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या प्रश्नसंचाचा एक सील नियमबाह्य पद्धतीने नागपूरातील एका सेंटरवर फोडण्यात आल्याचा आरोप करीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने परिक्षा केंद्रावर ठिय्या आंदोलन केले. आज सकाळी दहाच्या सुमारास पेपर सुरू झाला. त्यानंतर विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलंय. सुमारे दोन तास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते संबंधित सदर्न पॉइंट शाळेच्या परीक्षा केंद्रावर आंदोलन करीत बसले होते.

अभाविपच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे की, सकाळी त्यांना परीक्षा केंद्रमधून एका विद्यार्थ्याने या केंद्रावर केंद्रप्रमुख येण्याच्या आधीच प्रश्नसंचाचे सील फोडण्यात आल्याची माहिती दिली. त्यानंतर अभाविपचे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचले परीक्षा केंद्रावरील स्टाफ ने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर अभाविपने संपूर्ण घटना नागपूरचे जिल्हाधिकारी तसेच पोलिस आयुक्तांच्या लक्षात आणून दिली आणि परीक्षा केंद्र समोर ठिय्या आंदोलनावर बसले.

केंद्रप्रमुख आणि लिपिकाला निलंबित करा
पोलिसांनी परीक्षा केंद्रावर आल्यानंतर अभाविपच्या एका कार्यकर्तीला वरती नेऊन सत्य परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला. बाहेर आल्यानंतर पोलिसांचा दावा आहे की, प्रश्नसंचाचे तिन्ही सील पेपर सुरू होईपर्यंत शाबूत होत्या. तर अभाविपच्या संबंधित कार्यकर्तीचा आरोप आहे की परीक्षा केंद्रप्रमुख आणि एका लिपिकाने तिच्यासमोर प्रश्न संचाचे तीन सील पैकी एक सील आधीच फोडण्यात आल्याचे मान्य केले. या घटनेनंतर अभाविपचे कार्यकर्ते आंदोलनावर बसले. संबंधित केंद्रप्रमुख आणि लिपिकाला निलंबित करा अशी मागणी अभाविप च्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -