Sunday, December 22, 2024
Homeक्रीडादीपक चहरचं अर्धशतक व्यर्थ, भारताचा 4 धावांनी पराभव, दक्षिण आफ्रिकेने 3-0 ने...

दीपक चहरचं अर्धशतक व्यर्थ, भारताचा 4 धावांनी पराभव, दक्षिण आफ्रिकेने 3-0 ने जिंकली मालिका


दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या वनडेत विराट कोहली (Virat Kohli), शिखर धवन (Shikar Dhawan) नंतर दीपक चहरच्या (Deepak Chahar) धडाकेबाज अर्धशतकानंतरही टीम इंडियाचा 4 धावांनी पराभव झाला. या विजयासह टेम्बा बावुमाच्या संघाने एकदिवसीय मालिका 3-0 ने खिशात घातली. यजमानांकडून अँडिले फेहलुकवायो (Andile Phehlukwayo) आणि लुंगी एनगिडीने (Lungi Ngidi) प्रत्येकी तीन बळी घेतले.

दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 288 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने पाचव्या षटकात पहिली विकेट गमावली. कर्णधार केएल राहुलला वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने झेलबाद केले. पहिली विकेट 18 धावसंख्येवर पडल्यानंतर विराट कोहली आणि शिखर धवन यांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 98 धावांची उत्कृष्ट भागीदारी केली. मात्र 23व्या षटकात अँडिले फेहलुकवायोने खेळ फिरवला.



23 व्या षटकात दुसऱ्या चेंडूवर फेहलुकवायोने अर्धशतक झळकावणाऱ्या धवनला कर्णधार बावुमाकरवी झेलबाद केले. धवनने 84 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने 65 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर क्रीझवर आलेला नवा फलंदाज ऋषभ पंत षटकाच्या शेवटच्या चेंडूवर खाते न उघडता झेलबाद झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -