Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंगप्रजासत्ताक दिन परेडवेळी दाट धुके असण्याची शक्यता

प्रजासत्ताक दिन परेडवेळी दाट धुके असण्याची शक्यता

ताजी बातमी ऑनलाईन टीम

देशाची राजधानी दिल्लीतील थंडीचा कडाका वाढला असून येत्या बुधवारी प्रजासत्ताक दिनी परेडवेळी दाट धुक्याची चादर तसेच थंडगार हवा राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हिमालय पर्वतरांगात सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुळे दिल्लीत आगामी काही दिवस बर्फाळ हवा वाहणार आहे.

यामुळे परेडमध्ये सहभागी होणाऱ्या व परेड पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते. दिल्लीची हवा थंड असली तरी पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता नाही, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. याआधी 2015 आणि 2017 च्या प्रजासत्ताक दिन परेडवेळी अतिशय प्रतिकूल हवामान पहावयास मिळाले होते.

2017 साली तर पाऊस पडला होता. 2009, 2010, 2014, 2018 आणि 2021 साली देखील घनदाट धुक्यातच परेड पार पडली होती. 26 जानेवारीला बर्फाळ हवा खूप कमी वेळा पहावयास मिळते. गतवर्षी 26 जानेवारीच्या सकाळी किमान तापमान 2.1 अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेले होते. तर 2006 मध्ये पारा 4.8 अंश सेल्सिअसपर्यंत तर 2008 साली 4.1 अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरला होता. खासगी हवामान संस्था स्कायमेटने यंदाच्या 26 जानेवारीला धुके मोठ्या प्रमाणावर राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -