Wednesday, January 14, 2026
Homeकोल्हापूरशिरोलीत महामार्गावर पेट्रोल पंपावर दरोडा

शिरोलीत महामार्गावर पेट्रोल पंपावर दरोडा

शिरोली औद्योगिक वसाहतीसमोर महामार्गावर असलेल्या जाजल पेट्रोल पंपावर एका टोळीने धाडसी चोरी केली. त्यांनी दोन कामगारांना मारहाण करून अडीच लाखांची रोकड व मोबाईल असा सुमारे पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडली.

महामार्गावर अत्यंत रहदारीच्या ठिकाणी असलेल्या पंपावर धाडसी दरोडा पडल्याने परिसरात घबराट पसरली आहे. हा पेट्रोल पंप शिरोली पोलिस ठाण्यापासून थोड्या अंतरावर व रहदारीच्या ठिकाणी असल्याने अशी धाडसी चोरी झाल्याने पोलिसांच्या पेट्रोलिंगचा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर टोप गावच्या हद्दीत असणार्‍या जाजल पेट्रोल पंप रात्रपाळीत काम करणार्‍या जयदीश व्यंकटराव कांबळे व कुमार वघ्रे हे दोघे कामावर होते. ते रविवारी रात्री पेट्रोल पंप बंद करून ऑफिसमध्ये झोपले होते. सोमवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास 23 ते 25 वयोगटातील अज्ञात चार चोरट्यांनी दरवाजा कटावणीच्या सहाय्याने उचकटून ऑफिसमध्ये प्रवेश केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -