Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगफेक अकाऊंट तयार करुन अश्लील फोटो मागवले, नंतर व्हायरल करण्याची धमकी, वसईत...

फेक अकाऊंट तयार करुन अश्लील फोटो मागवले, नंतर व्हायरल करण्याची धमकी, वसईत भामट्याला बेड्या

ताजी बातमी ऑनलाइन टीम
मागील अनेक दिवसांपासून राज्यात चोरी, दरोडा अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिलांच्या सुरक्षेवरदेखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बीड, भिवंडी येथे महिलांवर सामूहिक बलात्काराच्या (Rape) धक्कादायक घटना घडल्या आहेत. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक निर्माण केला जावा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र महिला अत्याचाराचे प्रमाण कमी होताना दिसत नाहीये. सध्या पालघर जिल्ह्यातील वसई येथे तरुणीचे अश्लील फोटो व्हायरल (Viral Photo) करण्याची धमकी देणाऱ्या एका भामट्याला अटक करण्यात आले आहे. फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तरुणीकडून पैशांची मागणी करत होता. मात्र, पोलिसांनी (Police) त्याला बेड्या ठोकल्या असून त्याची सखोल चौकशी केली जात आहे. त्याने याआधीही तरुणींना फसवलेले आहे का ? याची पोलीस पडताळणी करत आहेत.

इन्स्टाग्रामच्या माध्यमातू तरुणीचे अश्लील फोटो मागवले
मिळालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या भामट्याने इन्स्टाग्रामवर मुलीच्या नावाने एक फेक अकाऊंट निर्माण केले होते. तसेच या अकाऊंटच्या माध्यमातून आरोपी तरुणींना प्रसिद्ध कंपनींच्या जाहिरातींचं प्रलोभन दाखवत होता. आपला संवाद एका मुलीशी होत असल्याचे गृहीत धरून इतर तरुणी त्याच्यासोबत संवाद साधत असत. पुढे वसई येथील एका तरुणीला या तरुणाने जाळ्यात ओढले. तसेच त्याने या मुलीचे इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अश्लील फोटो मागवले.

भामट्याला वसाई पोलिसांकडून बेड्या, चौकशी सुरु
पुढे याच फोटोंचा आधार घेत तो तरुणीला धमकावू लागला. तिचे अश्लील फोटो इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर टाकण्याची भीती दाखवून तो फसवणूक करु लागला. मात्र हा प्रकार पोलिसांपर्यंत गेल्यामुळे त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने अटक केली आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. याआधीही त्याने तरुणींना फसवलेले आहे का, याची चौकशी पोलीस करत आहेत. दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर आता पोलिसांनी तरुणी तसेच महिलांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियाचा वापर सजग पद्धतीने करावा. आपल्या ओळखीच्या लोकांसोबतच सोशल मीडियावर मैत्री करावी. तसेच आपली संवेदनशील माहिती तसेच फोटो इतरांना शेअर करु नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -