पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार आगामी कार्यकाळात सर्वांसाठी डिजिटल आयडी आणण्याचा विचार करत आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने “फेडरेटेड डिजिटल आयडेंटिटीज” (एफडीआय) चे नवीन मॉडेल तयार केले आहे. या मॉडेल अंतर्गत, एखाद्या व्यक्तीचे अनेक डिजिटल आयडी जसे की पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्राईविंग लायसन्स आणि पासपोर्ट हे एका प्रकारच्या आयडीद्वारे लिंक करून सेव्ह करता येतील आणि केव्हाही ऍक्सेस करता येतील.
या डिजिटल आयडीमुळे लोकांना अनेक ओळखपत्र आणि कागदपत्र एकत्र ठेवता येतील. तसेत त्यांना कोणते आयडी कोणत्या उद्देशासाठी वापरायचा आहे ते निवडण्याचा पर्याय ही मिळेल, अशी माहिती मंत्रालयाने दिली आहे.
या प्रस्तावात सांगितल्याप्रमाणे नव्या आयडीमध्ये प्रत्येक राज्याचे आणि केंद्राचे आयडी सेव्ह करता येऊ शकतात. या डिजिटल आयडीचा वापर ‘ईकेवायसी’द्वारे प्रमाणीत इतर सेवांचा लाभ घेण्यासाठीही करता येईल. तसेच सर्व डिजिटल आयडी एकमेकांशी जोडले गेल्यामुळे ओळखपत्रांचीे वारंवार पडताळणी (व्हेरिफिकेशन) करण्याची गरज पडणार नाही.