Thursday, September 19, 2024
Homeतंत्रज्ञानWhatsApp वापरकर्त्यांना झटका,चॅट बॅकअपसाठी द्यावे लागणार पैसे

WhatsApp वापरकर्त्यांना झटका,चॅट बॅकअपसाठी द्यावे लागणार पैसे

ताजी बातमी ऑनलाइन टीम

मेटा (फेसबुक) च्या मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग ॲप (WhatsApp ) सध्या जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मेसेजिंग ॲपपैकी एक आहे. जगभरात त्याच्या वापरकर्त्यांची संख्या दोन अब्जांपेक्षा जास्त आहे. व्हॉट्सॲप कडून आपल्या वापरकर्त्यांना चॅट बॅकअपची सुविधा देण्यात येते, जरी सुरुवातीला हे चॅट बॅकअप एंड-टू-एंड एनक्रिप्टेड नव्हते, परंतु गेल्या वर्षी व्हॉट्सॲपने सांगितले की, चॅट्सचा थर्ड पार्टी बॅकअप देखील एंड-टू-एंड एनक्रिप्टेड असेल म्हणजेच Google ड्राइव्ह किंवा आयक्लॉड पण चॅट्स बॅकअप घेण्यासाठी एंड-टू-एंड एनक्रिप्ट केलेले आहेत.

Android वापरकर्ते सहसा त्यांच्या व्हॉट्सॲप चॅटचा Google Drive वर बॅकअप घेतात. तुमच्या माहितीसाठी, Google Drive वरही तुमचे चॅट एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असते. आता गुगल व्हॉट्सॲप यूजर्सना मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे.अनलिमीटेड स्टोरेज मिळणार नाही.

रिपोर्टनुसार Google आता WhatsApp वापरकर्त्यांच्या चॅट बॅकअपसाठी Google Drive मध्ये अमर्यादित स्टोरेज देणार नाही. व्हॉट्सॲपच्या फीचर्सची माहिती देणाऱ्या wabetainfo च्या रिपोर्टनुसार Google लवकरच चॅट बॅकअपसाठी अमर्यादित स्टोरेजचे फीचर बंद करणार आहे, अद्याप Google किंवा WhatsApp कडून याबाबत अधिकृतपणे माहिती देण्यात आली नाही

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -