शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्लाप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग न्यायालयाने फेटाळला आहे.
शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्लाप्रकरणी न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आ. नितेश राणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोन दिवसांपूर्वी जिल्हा न्यायालयात स्वतः हजर झाले होते. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर साेमवारी सुनावणी झाली हाेती. आज न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.