दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार अशी माहिती विश्वसनीय सुत्रांकडून देण्यात आली आहे. तसेच या परीक्षा ठरलेल्या वेळेतच होणार असल्याचीही माहिती सुत्रांनी दिली आहे. काल शिक्षणमंत्री आणि बोर्ड अध्यक्ष यांच्यात बैठक झाली असल्याची माहिती समोर आली आहे. धारावीत झालेल्या घमासान आंदोलनानंतर परीक्षेत काय बदल होणार का? असा सवाल सर्वांच्या मनात उपस्थित झाला होता, परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी आंदोलनावेळी करण्यात आली होती. दोन दिवसापूर्वीच हजारो विद्यार्थी अचानक शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर जमले होते, त्यांतर या विद्यार्थ्यांचा मोठा उद्रेक झाल्यचे पाहायला मिळाले. त्यानंतर परीक्षांबाबत चर्चा करून निर्णय घेऊ असे आश्वसन शिक्षमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते, त्यामुळे परीक्षांचं काय होणार? परीक्षा ऑफलाईन होणार की ऑनलाईन होणार? असा संभ्रम अनेक विद्यार्थ्यांच्या मनात तयार झाला आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -