Friday, September 20, 2024
Homeतंत्रज्ञानसावधान ; पाण्यावर तरंगणारे पारदर्शक किडे

सावधान ; पाण्यावर तरंगणारे पारदर्शक किडे

टोरांटो : जगभरात अनेक अनोखे जीव आढळून येतात. त्यामध्येच ‘चाओबोरस मिज’ नावाच्या पारदर्शक किड्याचा समावेश होतो. हा किडा पारदर्शक असतो इतकेच त्याचे वैशिष्ट्य नसून तो पाण्यावर सहजपणे तरंगत असतो. हा दोन सेंटीमीटर लांबीचा काच कीडा असा पाण्यावर कसे काय तरंगतो याबाबत गेल्या शंभर वर्षांपासून सतत संशोधन सुरू होते. आता फिलिप मॅथ्यूज या संशोधकाने याबाबत संशोधन करून त्याचे रहस्य उलगडले आहे.

कॅनडातील बि—टिश कोलंबिया विद्यापीठातील प्राध्यापक असलेल्या मॅथ्यूज यांनी केलेल्या संशोधनाची माहिती ‘करंट बायोलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पारदर्शक असल्याने ‘चाओबोरस मिज’ला ‘फँटम मिज’ असेही म्हटले जाते. त्याचे लार्व्हा अनेक तळे व अन्य जलाशयांमध्ये आढळतात. सन 1911 मध्ये नोबेल पुरस्कार विजेते ऑगस्ट क्रोग यांना आढळले की चाओबोरस मिज पाण्यावर तरंगण्यासाठी एका पूर्णपणे वेगळ्या तंत्राचा वापर करतात. ते हवेने भरलेल्या दोन जोडी आंतरिक थैल्यांच्या सहाय्याने असे तरंगतात. मात्र, ही क्रिया नेमकी कशी होते याचे रहस्य उलगडले नव्हते.

याबाबत मॅथ्यूज यांनी सांगितले की हे विचित्र किडे पाण्यावर अलगदपणे तरंगतात. असे तटस्थपणे तरंगत राहणे अन्य किड्यांना शक्य होत नाही. काही किडे पाण्यात डुबकी घेऊन काही काळ तरंगतात; पण चाओबोरस हा असा एकमेव किडा आहे जो दीर्घकाळ तरंगत राहू शकतो.

मॅथ्यूज यांनी या किड्यांच्या हवेच्या थैल्यांचे सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केले. या थैल्या अतिनील किरणांच्या प्रकाशात निळ्या रंगात चमकू लागल्या. ही निळी चमक रेसिलिनमुळे निर्माण झाली होती. या किड्यांच्या शरीरातील रबरासारख्या भागात हा पदार्थ असतो. या लवचिक पदार्थामुळेच किडा पाण्यावर तरंगत राहतो. हा पदार्थ जर क्षारीय बनवला तर तो फुगतो. तसेच त्याला आम्लिय बनवले तर तो आकुंचित पावतो.

अशाप्रकारे हे किडे हवेच्या थैल्यांच्या भिंतींच्या पीएच स्तराला बदलत राहतात. या भिंती रेसिलिनच्या प्रतिक्रियांमुळे फुगतात किंवा आकुंचित होतात. त्यामुळे थैलीचे संतुलन साधले जाते व किडा तरंगत राहतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -