ताजी बातमी ऑनलाइन टीम
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. मुंबईतील (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy) उपचार सुरु शनिवारपासून प्रकृती ढासळलल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं आज सकाळी 8.12 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोना आणि न्यूमोनिया झाल्यानं त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 28 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लतादिदींची प्रकृती पुन्हा बिघडली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीसाठी देशभरातून प्रार्थना सुरु आहेत. डॉक्टरांच्या विशेष टीमच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉ. प्रतीत समदानी यांनी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. लता मंगेशकर या कोरोना आणि न्यूमोनियातून मुक्त झाल्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.