ताजी बातमी ऑनलाइन टीम
8.25 कोटी रुपयांच्या बोलीवर शिखर धवन पंजाबच्या संघात
पंजाब किंग्सने 8.25 कोटी रुपयांच्या बोलीवर शिखर धवनला आपल्या संघात घेतलं आहे. धवनसाठी दिल्लीने 8 कोटींपर्यंत बोली लावली. अखेर गेल्या वर्षी दिल्लीकडून खेळलेला धवन यंदा पंजाबकडून खेळणार आहे.
रवी अश्विनवर राजस्थान रॉयल्सची 5 कोटींची बोली
राजस्थान रॉयल्सने 5 कोटींच्या बोलीवर रवीचंद्रन अश्विनला आपल्या संघात घेतलं. अश्विन आणि जॉस बटलर यंदा एकाच संघाकडून खेळणार आहेत.
पॅट कमिन्सवर कोलकात्याची 7.25 कोटींची बोली
कोलकाता नाईट रायडर्सने पॅट कमिन्सवर 7.25 कोटींची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं. गेल्या वर्षी त्याच्यावर कोलकात्याने 15 कोटींची बोली लावली होती. कमिन्स आता पुन्हा एकदा कोलकात्याकडून खेळणार आहे.
कगिसो रबाडा पंजाब किंग्सच्या ताफ्यात
9.25 कोटी रुपयांच्या बोलीवर पंजाब किंग्सने कगिसो रबाडाला आपल्या ताफ्यात सामावून घेतलं.
राजस्थान रॉयल्सची ट्रेंट बोल्टवर सर्वात मोठी बोली
राजस्थान रॉयल्सने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टवर सर्वात मोठी 8 कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं. बोल्टवर मुंबईने 7.75 कोटी रुपयांची बोली लावली होती. मात्र राजस्थानने अखेर मुंबईचा खेळाडू आपल्याकडे घेतला.
कोलकात्याला कर्णधार मिळाला, श्रेयस अय्यर केकेआरच्या ताफ्यात
कोलकाता नाईट रायडर्सने 12.25 कोटी रुपयांच्या बोलीवर श्रेयस अय्यरला आपल्या ताफ्यात घेतलं. कदाचित अय्यरकडे कोलकात्याचं नेतृत्व सोपवलं जाऊ शकतं.
मोहम्मद शमी गुजरातच्या ताफ्यात
गुजरात टायटन्सने 6.25 कोटी रुपयांच्या बोलीवर मोहम्मद शमीला आपल्या ताफ्यात घेतलं. बँगलोरने शमीवर 6 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली होती
फाफ डुप्लेसी विराटच्या संघात
7 कोटी रुपयांच्या बोलीवर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने फाफ डुप्लेसीला आपल्या ताफ्यात सामावून घेतलं.
क्विंटन डीकॉक लखनौ संघात
लखनौ या नव्या फ्रँचायझीने 6.75 कोटी रुपयांच्या बोलीवर क्विटंन डीकॉकला आपल्या संघात घेतलं. डीकॉक याआधी मुंबईकडून खेळायचा मुंबईने डीकॉकवर 5 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली होती. मात्र डीकॉक आता केएल राहुलसोत लखनौसाठी सलामीला उतरणार आहे.
पृथ्वी शॉला सलामीचा जोडीदार मिळाला, वॉर्नर दिल्लीच्या ताफ्यात
डेव्हिड वॉर्नरवर दिल्ली कॅपिटल्सने 6.25 कोटी रुपयांची बोली लावली. त्यामुळे पृथ्वी शॉला सलामीचा जोडीदार मिळाला आहे.
मनिष पांडे लखनौच्या ताफ्यात
लखनौ सुपरजायंट्सने 4.60 कोटी रुपयांच्या बोलीवर मनिष पांडेला आपल्या ताफ्यात घेतलं. सुरुवातीला सनरायझर्स हैदाराबाद आणि नंतर दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यावर बोली लावली. अखेरी यात लखनौच्या विजय झाला.
शिमरन हेटमायर राजस्थान संघात
राजस्थान रॉयल्सने 8.50 कोटी रुपयांच्या बोलीवर शिमरन हेटमायरला आपल्या ताफ्यात घेतलं.
रॉबिन उथप्पासाठी चेन्नईची बोली
चेन्नईने 2 कोटी रुपयांच्या बोलीवर रॉबिन उथप्पाला आपल्या संघात घेतलं. उथप्पावर कोणत्याही संघाने बोली लावली नाही. अखेर चेन्नईने आपल्या खेळाडूला संघात परत घेतलं.
जेसन रॉय गुजरातच्या ताफ्यात
गुजरात टायटन्सने 2 कोटी रुपयांच्या बोलीवर जेसन रॉयला आपल्या संघात घेतलं. कोणत्याही संघाने जेसन रॉयसाठी बोली लावली नाही. अखेर गुजरात टायटन्सने दोन कोटींच्या बोलीवर त्याला आपल्या ताफ्यात घेतलं
मिस्टर आयपीएल सुरेश रैना अनसोल्ड, कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही
एके काळी मिस्टर आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनावर कोणत्याही संघाने बोली लावली नाही. त्याची बेस प्राईस 2 कोटी रुपये होती. चेन्नई सुपरकिंग्सनेदेखील रैनासाठी इंटरेस्ट दाखवला नाही.
देवदत्त पडीक्कल राजस्थानच्या ताफ्यात
युवा क्रिकेटपटू देवदत्त पडीक्कलसाठी राजस्थान रॉयल्सने 7.75 कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. मुंबईने त्याच्यावर 7.50 कोटी रुपयांची बोली लावली होती.
डेव्हिड मिलर, स्टिव्ह स्मिथ अनसोल्ड
किलर मिलर म्हणून ओळखला जाणारा द. आफ्रिकेचा क्रिकेटपटू डेव्हिड मिलर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ हे दोन्ही खेळाडू अनसोल्ड राहिले.
दीपक हुडा लखनौच्या ताफ्यात
भारतीय अष्टपैलू खेळाडू दीपक हुडासाठी लखनौ सुपरजायंट्सने 5.75 कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं.
ड्र्व्हेन ब्राव्हो चेन्नईत कायम
वेस्ट इंडिजचा खेळाडू ड्र्व्हेन ब्राव्हो चेन्नई सुपरकिंग्समध्ये कायम राहील. 4.40 कोटी रुपयांच्या बोलीवर चेन्नईने त्याला संघात घेतलं.
नितीश राणा कोलकात्याच्या संघात कायम
8 कोटी रुपयांच्या बोलीवर कोलकाता नाईट रायडर्सने नितीश राणाला आपल्या संघात परत घेतलं.
जेसन होल्डर लखनौ सुपरजायंट्स संघात
वेस्ट इंडिंजचा अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरसाठी लखनौ सुपरजायंट्सने 7.75 कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं. होल्डरसाठी चेन्नई सुपरकिंग्सनेदेखील मोठी बोली लावली होती.
पर्पल कॅप होल्डर हर्षल पटेलसाठी 10.75 कोटींची बोली
आयपीएल 2021 मधील पर्पल कॅप होल्डर हर्षल पटेलसाठी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने 10.75 कोटींची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं.
शाकिब अल हसन अनसोल्ड
बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनसाठी कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही. त्यामुळे शाकिब अनसोल्ड राहिला.
वानिंदू हसरंगा आरसीबीच्या ताफ्यात, दिवसभरातला दुसरा सर्वात महागडा खेळाडू
10.75 कोटी रुपयांच्या बोलीवर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने वानिंदू हसरंगाला आपल्या ताफ्यात घेतलं. तो दिवसभरातला दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. पहिल्या सत्रात श्रेयस अय्यरसाठी कोलकात्याने 12.25 कोटी रुपयांची बोली लावली होती.
वॉशिंग्टन सुंदरसाठी हैदराबादची 8.75 कोटींची बोली
सनरायझर्स हैदराबादने आज आपला पहिला खेळाडू खरेदी केला आहे. फ्रँचायझीने 8.75 कोटींच्या बोलीवर अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला आपल्या संघात घेतलं.
कृणाल पंड्या लखनौच्या ताफ्यात, मुंबईने बोली लावली नाही
लखनौ सुपरजायंट्सने 8.25 कोटी रुपयांच्या बोलीवर अष्टपैलून कृणाल पंड्याला आपल्या ताफ्यात घेतलं. हैदराबाद, चेन्नई आणि गुजरात या फ्रँचायझींनी कृणालवर बोली लावल्या अखेर लखनौने बोली जिंकली. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्सने कृणाल पंड्यावर बोली लावली नाही. कृणाल गेली अनेक वर्ष मुंबईकडून खेळत होता.
मिचेल मार्श दिल्ली कॅपिटल्स संघात
नुकत्याच पार पडलेल्या टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात सामनावीर ठरलेला ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श याला दिल्ली कॅपिटल्सने आपल्या ताफ्यात घेतलं. दिल्लीने त्याच्यासाठी 6.50 कोटी रुपयांची बोली लावली. हैदराबादने या खेळाडूसाठी 6.25 कोटींची बोली लावली होती.
मोहम्मद नबी अनसोल्ड
अफगाणिस्तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबीवर कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही. त्यामुळे हा खेळाडू आज अनसोल्ड राहिला.
मॅथ्यू वेड अनसोल्ड
नुकत्याच पार पडलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये सेमीफायनल सामन्यात शाहीन आफ्रिदीला सलग चार षटकार ठोकून ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये पोहोचवणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडसाठी कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही. हा खेळाडू आज अनसोल्ड राहिला.
अंबाती रायुडू पुन्हा एकदा पिवळ्या जर्सीत दिसणार
अंबाती रायुडू पुन्हा एकदा पिवळ्या जर्सीत दिसणार आहे. चेन्नई सुपर किंग्सने 6.75 कोटी रुपयांच्या बोलीवर त्याला आपल्या ताफ्यात सामावून घेतलं. रायुडूसाठी हैदराबाद आणि दिल्लीनेही बराच वेळ बोली लावली. अखेर ही बोली चेन्नईने जिंकली.
इशान किशनसाठी मुंबईची आयपीएल इतिहासातली सर्वात मोठी बोली
इशान किशनसाठी मुंबई इंडियन्सने आयपीएल इतिहासातली सर्वात मोठी बोली लावली आहे. मुंबईने 15.25 कोटी रुपयांच्या बोलीवर इशान किशनला आपल्या ताफ्यात घेतलं. किशनसाठी पंजाब, हैदराबाद आणि राजस्थानने मोठमोठ्या बोली लावल्या, अखेर हे बिडींग वॉर मुंबईने जिंकलं.
जॉनी बेअरस्टो पंजाब किंग्स संघात
इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो पंजाब किंग्सकडून खेळताना दिसणार आहे. पंजाबने 6.75 कोटी रुपये खर्चून बेअरस्टोला आपल्या संघात घेतलं.
दिनेश कार्तिक बँगलोरमध्ये
दिनेश कार्तिकसाठी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि चेन्नई सुपरकिंग्समध्ये बिडींग वॉर पाहायला मिळालं. हे वॉर बँगलोरने जिंकलं. बँगलोरने 5.50 कोटी रुपयांमध्ये कार्तिंकला आपल्या संघात घेतलं.
ऋद्धीमान साहा अनसोल्ड
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋद्धीमान साहा आजच्या दिवसात अनसोल्ड राहिला. कोणत्याही फ्रँचायझीने त्याच्यावर बोली लावली नाही.
सॅम बिलिंग्स अनसोल्ड
सॅम बिलिंग्स या यष्टीरक्षक फलंदाजावर कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही. हा खेळाडूदेखील आज अनसोल्ड राहिला.
निकोलस पूरन आजच्या दिवसातला तिसरा सर्वात महागडा खेळाडू
निकोलस पूरन आजच्या दिवसातला तिसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. 10.75 कोटी रुपयांच्या बोलीवर सनरायझर्स हैदराबादने त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्यासाठी 10.50 कोटींपर्यंत बोली लावली. पर्समध्ये केवळ 20 कोटी रुपये असूनही कोलकात्याने पूरनसाठी बोली लावली.
टी. नटराजन सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात
टी. नटराजनवर सनरायझर्स हैदराबादने 4 कोटी रुपयांची बोली लावून त्याला आपल्या संघात घेतलं. त्याच्यासाठी गुजरात टायटन्सने बराच वेळ बिडींग केलं. मात्र हैदराबादने हे बिडींग वॉर जिंकलं.
दीपक चाहरसाठी चेन्नईची आयपीएल इतिहासातली सर्वात मोठी बोली
मोठ्या बिडींग वॉरनंतर दीपक चाहरला चेन्नईने पुन्हा एकदा आपल्या ताफ्यात घेतलं आहे. चेन्नईने त्याच्यासाठी 14 कोटींची बोली लावली. दीपकसाठी दिल्ली, चेन्नई, राजस्थान आणि हैदराबाद या फ्रँचायझींमध्ये बिडींग वॉर पाहायला मिळालं.
प्रसिद्ध कृष्णासाठी राजस्थानची 10 कोटींची बोली
जलदगती गोलंदाज प्रसिद्ध कृष्णासाठी राजस्थानने 10 कोटींची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं. कृष्णा यंदाच्या लिलावातला दुसऱा सर्वात महागडा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
उमेश यादव अनसोल्ड
भारतीय जलदगती गोलंदाज उमेश यादवसाठी कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही. हा खेळाडू आजच्या दिवसासाठी अनसोल्ड राहिला.
लॉकी फर्ग्युसनसाठी गुजरातची 10 कोटींची बोली
लॉकी फर्ग्युसनसाठी 10 कोटी रुपयांची बोली लावत गुजरात टायटन्सने त्याला आपल्या ताफ्यात घेतलं
जॉश हेजलवूड बँगलोरच्या ताफ्यात
7.75 कोटी रुपयांची बोली लावत रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज जॉश हेजलवूडला आपल्या ताफ्यात घेतलं. मुंबईने त्याचासाठी 7.50 कोटींची बोली लावली होती
मार्क वूडसाठी लखनौची सर्वात मोठी बोली
7.50 कोटी रुपयांची बोली लावत लखनौ सुपरजायंट्सने मार्क वूडला आपल्या ताफ्यात घेततं. मुंबईने त्याचासाठी 7.25 कोटींची बोली लावली होती.
भुवनेश्वर कुमार पुन्हा एकदा ऑरेंज आर्मीत
भुवनेश्वर कुमार पुन्हा एकदा ऑरेंज आर्मीकडून खेळताना दिसणार आहे. सनरायझर्स हैदाराबादने भुवनेश्वर कुमारसाटी 4.20 कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात घेतलं.
लॉर्ड ठाकूरवर पैशाचा पाऊस, तब्बल 10.75 कोटींची बोली
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लॉर्ड या नावाने प्रसिद्ध असलेल्या जलदगती गोलंदाज शार्दुल ठाकूरवर आयपीएलच्या लिलावात पैशाचा पाऊस पडला. दिल्ली कॅपिटल्सने त्याला 10.75 कोटी रुपयांच्या बोलीवर आपल्या संघात घेतलं. ठाकूरसाठी दिल्ली, पंबाज आणि चेन्नई या तीन फ्रँचायझींमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली.
बांगलादेशी जलदगती गोलंदाज मुस्तफिजूर रहमान दिल्लीच्या ताफ्यात
दिल्ली कॅपिटल्सने 2 कोटी रुपयांच्या बेस प्राईसमध्ये बांगलादेशी जलदगती गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला आपल्या संघात घेतलं.
कुलदीप यादव दिल्ली कॅपिटल्स संघात
दिल्ली कॅपिटल्सने 2 कोटी रुपयांच्या बोलीवर भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवला आपल्या संघात घेतलं. कुलदीपसाठी पंजाब किंग्सने बोली लावली होती.
आदील रशीद, इम्रान ताहीर, मुजीब जादरान अनसोल्ड
इंग्लंडचा फिरकीपटू आदील रशीद, द. आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहीर आणि अफगाणिस्तानचा फिरकीपटू मुजीब जादरान या तिघांवर कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही. हे तिन्ही खेळाडू अनसोल्ड राहिले.
राहुल चाहर पंजाब किंग्सच्या ताफ्यात
5.25 कोटी रुपयांच्या बोलीवर पंजाब किंग्सने राहुल चाहरला आपल्या ताफ्यात सामावून घेतलं आहे. राजस्थान रॉयल्सने बराच वेळ राहुलसाठी बिडींग केलं
युजवेंद्र चहल राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात
भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलला राजस्थान रॉयल्सने 6.5 कोटी रुपयांच्या बोलीवर आपल्या ताफ्यात घेतलं आहे.
अमित मिश्रा अनसोल्ड
भारतीय फिरकीपटू अमित मिश्रासाठी कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही. हा खेळाडू अखेर अनसोल्ड राहिला.
रजत पाटीदार अनसोल्ड
भारतीय युवा खेळाडू रजत पाटीदार अनसोल्ड राहिला
प्रियम गर्ग हैदराबादच्या ताफ्यात
हैदराबादने 20 लाख रुपयांच्या बेस प्राईसमध्ये प्रियम गर्गला आपल्या ताफ्यात घेतलं.
आज 161 खेळाडूंवर बोली लागली : पहा कोण कोणत्या संघामध्ये व कोणावर किती बोली लागली
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -