Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीबेसिक कॉलिटीची मजुरी १८ पैसे प्रतिपिक ( बैठकीत निर्णय )

बेसिक कॉलिटीची मजुरी १८ पैसे प्रतिपिक ( बैठकीत निर्णय )

ताजी बातमी ऑनलाइन टीम

रॅपिअर कारखानदारांची बेसिक क्वॉलिटीची मजूरी १८ पैसे प्रतिपिक करण्याचा निर्णय इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनमध्ये झालेल्या रॅपिअर कारखानदारांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. त्याची अंलबजावणी १५ फेब्रुवारी २०२२ पासून करण्याचा निर्धार करण्यात आला.
१५ नोव्हेंबर २०२० पासून बेसिक क्वॉलिटीची कमीतकमी मजूरी १५.५ पैसे प्रतिपिक ठरविण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी मागील दीड वर्षभरापासून चालू आहे. त्यामध्ये नियमित वाढ होऊन ती मजुरी ३५ पैसे प्रतिपिकपर्यंत गेली.

आता यापुढे हिच बेसिक मजुरी १८ पैसे करण्याचा निर्णय मिटिंगमध्ये चर्चेअंती घेण्यात आला. त्याचबरोबर पॉवरलूम असोसिएशनच्यावतीने नियुक्त दलालांच्याकडूनच मजुरीची बीमे करण्याचा निर्णय घेण्यात आला. फेब्रुवारीपर्यंत इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्यावतीने काही ठराविक दलाल ने मले जातील व सर्व कारखानदारांनी त्याच दलालांमार्फत मजुरीची बीमे करण्याचे एकमताने ठरले. त्याची अंमलबजावणी १ मार्च 2022 पासून केली जाईल. रॅपिअर कारखानदारांनी या निर्णयावर ठाम रहाण्यासाठी आपापसात सामंजस्य करार करून त्यावरती सह्या करण्याचे ठरले.

प्रलंबित ७५ पैसे वीज दराच्या सवलतीबाबत एक महिन्याच्या आत निर्णय करून कारखानदारांना दिलासा द्यावा अशी विनंतीवजा मागणी करण्यात आली. बैठकीला सतीश कोष्टी, चंद्रकांत पाटील, रफिक खानापुरे, सुभाष बलवान, चंद्रकांत भोपळे, संजय कांबळे, प्रकाश मोरे, दीपक सुर्वे, सुकुमार देवमोरे, अश्विन कोकळकी, कृष्णात सातपुते, सचिन हावले, शिलकुमार पाटील, अभिजित रवंदे, सुधाकर कुलकर्णी व कारखानदार उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -