टीम इंडिया (INDvsWI T20) अडचणीत असताना सूर्यकुमार यादव (नाबाद 34) व वेंकटेश अय्यर (नाबाद 24) यांनी केलेली 48 धावांची निर्णायक भागीदारी आणि हिटमॅन रोहित शर्मा (40), इशान किशन (35) यांच्या उपयुक्त फलंदाजीच्या बळावर भारताने पहिल्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजवर 6 विकेटस्ने मात केली. याबरोबरच टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. टी-20 प्रारूपातील टीम इंडियाचा हा सलग सातवा विजय आहे. पदार्पणातच 17 धावांत 2 विकेट घेणारा रवी बिष्णोई सामनावीर ठरला.
कॅरेबियन संघाने विजयासाठी दिलेले 158 धावांचे टार्गेट भारताने 18.5 षटकांत 4 विकेट 162 धावा काढून पार केले. रोहित व इशान किशन यांनी आक्रमक सुरुवात करताना 4.3 षटकांत संघाचे अर्धशतक फलकावर लावले. मात्र, रोस्टन चेजला षटकार खेचण्याच्या प्रयत्नात रोहित (40) सीमारेषेवर झेलबाद झाला. त्याने 19 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकार खेचले.
भारताने 10 षटकांत 1 बाद 80 धावापर्यंत मजल मारली. त्यानंतर चेजनेच इशानला (35) अॅलेनकरवी झेलबाद करत भारताला दुसरा धक्का दिला. कोहलीही अॅलेनच्या गोलंदाजीवर 17 धावांवर परतला. भारत 3 बाद 95. त्यानंतर रिषभ (8) याला कॉट्रेलने झेलबाद केले. मात्र, सूर्यकुमार (नाबाद 34) व वेंकटेश अय्यर (नाबाद 24) यांनी 48 धावांची अभेद्य भागीदारी करून विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
तत्पूर्वी, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केले. कॅरेबियन संघाने निर्धारित 20 षटकांत 7 बाद 157 धावा काढल्या. या सामन्यात केकेआरचा नवनियुक्त कर्णधार श्रेयश अय्यरला अंतिम अकरात संधी मिळाली नाही. (INDvsWI T20)
भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात वेस्ट इंडिजला धक्का देताना सलामीवीर ब्रेंडॉन किंग (4) याला सूर्यकुमारकरवी झेलबाद केले. त्यानंतर काईल मेयर्स व निकोलस पूरन यांनी सावध फलंदाजी करत पाच षटकांत संघाला 1 बाद 35 अशी स्थिती प्राप्त करून दिली. ही जोडी डोकेदुखी ठरणार असे वाटत असतानाच चहलने आक्रमक फटकेबाजी करणार्या मेयर्सला (31) पायचित करून भारताला दुसरे यश मिळवून दिले.
IND vs WI, 1st T20, LIVE Cricket Score: पहिली टी 20 भारताने जिंकली, मालिकेत 1-0 अशी आघाडी
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -