सध्या देशभरामध्ये कोरोना पसरला आहे. त्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे म्हणून रक्तदान शिबिर घेऊन राष्ट्रसेवा करावी या उद्देशाने सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री.संत गजानन महाराज प्रकट दिनानिम्मित विविध सामाजिक कार्यक्रम शिवपुराण कथा, भाविकांसाठी महाप्रसाद तसेच दिनांक. २३-२-२२ वार.बुधवार रोजी धनश्री महिला पतसंस्था यांच्या सौजन्याने गजानन महाराज मंदिराच्या प्रांगणात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिराला बोदवड़करांनी चांगला प्रतिसाद दिला. ८२ रक्तदात्यांनी या महारक्तदान शिबिरात आपले योगदान दिले.महिलांनी सुद्धा रक्तदानात भाग घेतला. रक्तदान संकलन करण्यासाठी जळगाव येथील माधवराव गोवळकर रक़्तपेढीतील अर्जुन राठोड जनसंपर्क अधिकारी, डॉ. बी.आर.पाटील, सुनील पाटील, किरण पाटील, रामचंद्र पोतदार यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी अमोल देशमुख, अनीलसेठ खंडेलवाल, अनंतभाऊ कुलकर्णी, अमोल शिरपुरकर, धनराज सुतार, संजय अग्रवाल, प्रदीप राणे, कृष्णा जाधव, अभिषेक झाबक, चेतन तांगड़े, राहुल माळी, जय देशमुख, प्रतीक देशमुख सर, विक्की कुलकर्णी आदिंनी मेहनत घेतली असे रोहित अग्रवाल यांनी कळवले
रक्तदान श्रेष्ठदान: बोदवडेत सामाजिक उपक्रम महिलांसह उस्फूर्त प्रतिसाद
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -