Sunday, December 22, 2024
HomeमनोरंजनJhund: नागराजच्या झुंडवर कोर्टात निर्णय, निर्मात्याला 10 लाखाचा दंड, सिनेमा स्थगितीचीही मागणी

Jhund: नागराजच्या झुंडवर कोर्टात निर्णय, निर्मात्याला 10 लाखाचा दंड, सिनेमा स्थगितीचीही मागणी

नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. सगळीकडे याच सिनेमाविषयी बोललं जातंय. महानायक अमिताभ बच्चन यांचा अभिनय, सिनेमाची कथा याबद्दल सर्वत्र बोललं जातंय. हिंदीतील टॉप दिग्दर्शकांनी या सिनेमाचं तोंड भरून कौतुक केलं.”भारताकडून हा सिनेमा ऑस्करसाठी नॉमिनेट झाला पाहिजे”, असं एका दिग्दर्शकाने म्हटलंय. इतकंच काय आमिर खानही  या सिनेमाबद्दल भरभरून बोलला. एका क्रिडा शिक्षक आणि त्याचे झोपडपट्टीतील विद्यार्थी यांच्यावर हा सिनेमा बेतलेला आहे. नागराज मंजुळे यांच्या सैराटच्या तुफान यशानंतरचा हा बिग बींसोबतचा सिनेमा अनेकांचं लक्ष वेधतोय. मात्र अश्यात झुंडवर बंदी घाला अशी मागणी होतेय. त्यामुळे नागराज मंजुळे यांच्यासाठी हा मोठा धक्काच म्हणावं लागेल.

नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड सिनेमाचा सर्वत्र बोलबाला आहे. अश्यात “हा सिनेमा स्थगित करा”, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात करण्यात आली आहे. हैद्राबादमधले चित्रपट निर्माते नंदी चिन्नी कुमार यांनी झुंडविरोधात याचिका दाखल केली आहे. यात त्यांनी सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली.

निर्मात्याला 10 लाखांचा दंड

या प्रकरणी सुनावणी करताना तेलंगणा उच्च न्यायालयाने निर्माते नंदी चिन्नी कुमार यांना 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाने त्यांना ही रक्कम एका महिन्याच्या आत पंतप्रधानांच्या कोविड-19 रिलीफ फंडात भरण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्त्याने रक्कम वेळेत न भरल्यास जिल्हाधिकार्‍यांनी 30 दिवसांच्या आत महसूल वसुली कायद्यांतर्गत ती वसूल करून ती पीएम फंडात पाठवावी, असे आदेशही न्यायालयानं दिले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -