Sunday, July 6, 2025
Homeक्रीडामुंबई इंडियन्सच्या माजी बॉलरची आयपीएलमध्ये एन्ट्री!

मुंबई इंडियन्सच्या माजी बॉलरची आयपीएलमध्ये एन्ट्री!

ताजी बातमी ऑनलाईन टीम
आयपीएल स्पर्धेच्या 15 व्या सिझनपूर्वी बेंगळुरूमध्ये ऑक्शन झाले. दोन दिवस झालेल्या या ऑक्शननंतर काही खेळाडू अनसोल्ड ठरले. यापैकी काही जण ढाका प्रीमियर लीग स्पर्धा खेळणार आहेत. तर चेतेश्वर पुजारा इंग्लिश काऊंटी क्रिकेट खेळणार आहेत. त्यानंतरही काही खेळाडू असे आहेत की जे ऑक्शन दरम्यान अनसोल्ड ठरले तरी आयपीएलमध्ये दिसणार आहेत.



हे खेळाडू आयपीएल स्पर्धेत कॉमेंटेटर म्हणून नवी इनिंग सुरू करणार आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) सुरेश रैना (Suresh Raina) हा यापैकी एक आहे. आता रैनाच्या मदतीला त्याचा टीम इंडियाचा माजी सहकारी पियूष चावला (Piyush Chawala) हा देखील रैना सोबत आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान हिंदी कॉमेंट्री करताना दिसेल.

2011 च्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचा सदस्य असलेला चावला हा आयपीएल इतिहासातीलही एक यशस्वी बॉलर आहे. चावला मागील सिझनमध्ये मुंबई इंडियन्सचा (mumbai indians) सदस्य होता. ipl स्पर्धेच्या इतिहासात सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्या बॉलर्सच्या यादीमध्ये चावला चौथ्या क्रमांकावर आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -