ताजी बातमी ऑनलाईन टीम
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तपास यंत्रणांच्या धाडी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं. तुम्हाला सत्ता पाहिजेत ना. सगळ्यांच्या समोर सांगतो. पेनड्राईव्ह गोळा करू नका. ज्यांना पाहिजे त्यांना पेनड्राईव्ह द्या. मी तुमच्यासोबत येतो. सत्तेसाठी येत नाही. याच्यावर टाच मार, त्याच्यावर टाच मार, कुटुंबीयांवर धाडी टाक हे जे काही तुम्ही जे चाळे केले आहेत. त्यामुळे मी तुमच्यासोबत येतो. टाका मला तुरुंगात, असं खुलं आव्हानच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिलं.
मी तुमच्या कुटुंबाचे कधी भानगडी काढल्या? याचं शेपूट त्याला, त्याचे शेपूट त्याला जोडलं जातं आहे. एवढाच जीव जळत असेल तर मला टाका तुरुंगात. मी थोडसं भावनिक बोलतो. बाबरीच्या (babri masjid) खाली राम जन्मभूमी (ram janmabhoomi) होती. तसे कृष्णजन्मभूीच्या खाली काही तुरुंग असेल तर बघा. तिथे मला टाका. मी कृष्ण नाही. पण तुम्ही कंस बनू नका, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.
आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं. बाळासाहेबांना काय उत्तर देणार असं मला विचारलं जातं. बाळासाहेबांनी तुमच्या नेत्यांना वाचवलं ते तरी काय उत्तर देणार.
देशात सर्व सांगत होते हे नको… हे नको. तेव्हा बाळासाहेब म्हणाले हे राहू द्या. काय उत्तर देणार. 2006 साली मी हिंदू होतो, आजही आहे. तुरुंगात टाकणार असाल तर मी सर्वांची जबाबदारी घेतो. माझ्या शिवसैनिकांचीही घेतो. टाका मला तुरुंगात. पण ज्या शिवसैनिकांनी मुंबई वाचवली, त्यांचा छळ कशासाठी? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.