Friday, March 14, 2025
Homeकोल्हापूर'सतेज पाटील आणि कुटुंबियांविरोधात ईडीकडे तक्रार करणार'

‘सतेज पाटील आणि कुटुंबियांविरोधात ईडीकडे तक्रार करणार’

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात इकडे लवकरच तक्रार करणार असल्याची माहिती माजी महापौर सुनील कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. आम्ही कुणाच्या सांगण्यावरून ही तक्रार करत नाही, त्यांची चोरी आमच्या ताब्यात आहे. या विरोधात कुठे दावा करणार असतील तर त्यांनी बिनधास्त करावा असे खुले आव्हानही त्यांनी दिले.


सर्वसामान्य जनतेला महापालिका २४ टक्के दंडव्याज यासह जप्तीच्या नोटिसा पाठवत आहे. मग ३० कोटींचा घरफाळा थकवणाऱ्या पालकमंत्री सतेज पाटील यांना नोटीस का नाही ? असा सवालही कदम यांनी केला.


कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर महाविकास आघाडीकडून दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव या महाविकास आघाडीकडून उमेदवारी लढवत आहेत. तर भाजप आणि मित्रपक्षाकडून सत्यजीत नाना कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडताना दिसत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -